Sanjay Raut (Photo Credit - Twitter)

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl Case) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडी (ED) चौकशी केली. त्यानंतर रविवारी, 31 जुलै रोजी दुपारी 4 वाजता राऊत यांना ईडीने ताब्यात घेण्यात आले. सकाळी 7 वाजता सुरु झालेल्या चौकशीच्या 9 तासांनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आले. संबंधित प्रकारावर फक्त राज्यभरातचं नाही तर संपूर्ण देशात या घटनेचे पडसाद बघायला मिळाले. काल ईडीच्या कारवाईनंतर आज संजय राऊतांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी आता खासदार संजय राऊतांवर FIR दाखल करण्यात आली आहे.  तरी पत्राचाळ प्रकरणात लवकरच संजय राऊतांवर कारवाई केली जाईल असं भाकीत कालचं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलं होत आणि आज लगेच संजय राऊत यांच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे.

 

पत्राचाळ प्रकरणी एका महिलेला संजय राऊतांनी धमकावल्याचा आरोप करत त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. संजय राऊतांविरुध्द तक्रार दाखल करणाऱ्या महिलेचं नाव स्वपना पाटकर असुन त्यांना पत्राचाळ प्रकरणी धमकी दिल्याबाबत FIR दाखल करण्यात आली आहे. IPC सेक्शन 509,506,504 नुसार संजय राऊत यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी संजय राऊत विरोधात दाखल केलेल्या FIR ची कॉपी (Copy) स्वतच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेअर (Twitter Account Share) केली आहे. (हे ही वाचा:- Sanjay Raut ED Enquiry: केंद्र सरकारकडून ईडी, सीबीआयआणि आयटी सारख्या प्रमुख तपास यंत्रणांचा गैरवापर केल्यासंबंधी शिवसेनेकडून राज्यसभेत कामकाजाच्या निलंबनाची नोटीस)

 

लोकांवर खोटे आरोप आणि कागदपत्रे तयार केली जात आहेत. शिवसेना (Shiv Sena) आणि महाराष्ट्र (Maharashtra) कमकुवत करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. मी झुकणार नाही आणि पक्ष सोडणार नाही, अशी प्रतिक्रीया काल संजय राऊत यांनी ईडीने ताब्यात घेतल्यावर दिली होती. तरी आता या नव्या आरोपावर संजय राऊत सह शिवसेना काय भुमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.