बृहन्मुंबई महानगरपालिकाने (Brihanmumbai Municipal Corporation) परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेशाची पुष्टी मिळविलेल्या आणि ज्यांना त्यासाठी रोगप्रतिबंधक लस ( Corona Vaccine) टोचणे आवश्यक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील (Mumbai) तीन केंद्रावर मोफत आणि वॉक-इन लसीची (Walk-in Vaccination) व्यवस्था केली आहे. त्यानुसार, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या 3 रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. राजावाडी रुग्णालयात (31 मे), कूपर रुग्णालय (1 जून) आणि कस्तुरबा रुग्णालय (2 जून), अशाप्रकारे लस टोचली जाणार आहे. यासदंर्भात महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे यांच्या ट्विटनुसार, विद्यार्थ्यांना आय-20 किंवा डीएस - 160 फॉर्म पुष्टीकरण पत्र संबंधित परदेशी विद्यापीठांसमवेत वैयक्तिक आयडी कागदपत्रांसह नेणे आवश्यक आहे. तसेच परदेशातील विद्यापीठांना पुष्टी पत्र असलेल्या शहरांमध्ये व त्या आसपासच्या विद्यार्थ्यांसाठीही ही अंमलबजावणी करण्यासाठी आपण राज्यभरातील इतर महानगरपालिकांशी बोलणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. हे देखील वाचा- Maharashtra SSC Exam Results 2021: अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वैकल्पिक सीईटी द्यावी लागणार- शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
आदित्य ठाकरे यांचे ट्वीट-
The students need to carry I- 20 or DS- 160 form/ verified confirmation letter to concerned foreign universities, along with personal id documents.
This admission and vaccine affecting careers, we are duty bound to vaccinate them in the required time.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 28, 2021
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक परिक्षा रद्द किंवा लांबणीवर पडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना आधी कोरोनाची लस द्यावी. त्यानंतरच परीक्षा घेण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला आहे. याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. यासंदर्भात सरकार कोणती भुमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.