Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

सोमवारीपासून बीएमसी (BMC) मुंबई (Mumbai) शहरभरातील 244 ठिकाणी कोरोना विषाणूच्या (Coronavirus) विनामूल्य चाचणी सुरु करणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी नागरिक स्थानिक वॉर्ड वॉर रूमवर किंवा 1916 वर कॉल करू शकतात किंवा आपल्या घराजवळील जवळील चाचणी केंद्र जाणून घेण्यासाठी ऑनलाईन तपासू शकतात. अशा चाचणी केंद्रांची संख्या 300 वर घेऊन जाण्याचा मानस आहे. जवळपास 54 खासगी प्रयोगशाळा होम सर्विशसह या चाचण्या देत आहेत. सुरुवातीला ही सुविधा सर्व नागरी प्रभागांमधील विविध नागरी दवाखाने व रुग्णालयांमध्ये, सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत जाण्यासाठी उपलब्ध असेल.

कोविड-19 च्या राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले की, 'मुंबईत सातत्याने कोरोना विषाणू रुग्णसंख्या घटत चालली आहे. यासह मृतांची संख्या आणि सक्रीय रुग्णांची संख्या नाही वाढली आहे नाही कमी होत आहे. मुंबईत कोरोनाच्या पुरेशा चाचण्या होत नसल्याची सतत तक्रार होत होती. म्हणूनच बीएमसीने हा नवा उपक्रम सुरु केला आहे. बीएमसी आता kiosks नावाचे कोरिअन/चायनीज मॉडेल चाचणी करण्यासाठी सर्वत्र राबवित आहे जी अगदीच वैध पध्दत आहे. यामुळे या आजाराशी संबंधित भीती कमी होण्यास मदत होईल आणि नागरिकांना चाचणी करून घेण्यास प्रोत्साहित केले जाईल.' (हेही वाचा: अंधेरी मध्ये पोलिसांची पब, बार वर धडक कारवाई; कोविड 19 लॉकडाऊन नियम उल्लंघनाचा ठपका ठेवत 196 जणांना अटक)

गणेशोत्सवानंतर आणि लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर शहरामध्ये कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सध्याच्या सणाच्या हंगामामध्ये हा आजार 'सुपर स्प्रेडर' म्हणून या विषाणूकडे पाहिले जात आहे. अशात रुग्णांना वेळेवर शोधून काढणे आणि उपचारांची खात्री करणे यासाठी वाढीव चाचण्या मदत करू शकतील. डॉ. जोशी पुढे म्हणाले की, आता सरकारने हळू हळू गोष्टी पूर्वपदावर आणायला सुरुवात केल्यानंतर, मुंबईबाहेर गेलेले लोक परत शहरामध्ये यायला सुरुवात होईल आणि त्यामुळे मुंबई अधिक असुरक्षित बनेल.