Mumbai News: मित्राची 52 लाखांची फसवणूक, व्यावसायिकेवर आझाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
arrest (संग्रहित संपादित प्रतिमा)

Mumbai News: मुंबईतील घाटकोपर येथे मित्राची 52 लाखांची रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यावसायिकेवर गुन्हा दाकल होताच त्याला अटक केले आहे. अमीन सरगुरो असं पीडितेचे नाव आहे. तर मनीष दामजी वोराणी असं अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकेचे नाव आहे. मनीला पैशांची गरज होती असं सांगत त्याने अमीन कडून पैसे घेतले होते. हेही वाचा- लिव्ह - इन पार्टनरची हत्या,महिला आरोपीला अटक, कोलकत्ता हादरलं

मिळालेल्या माहितीनुसार, अमीन हा रायगड येथील उरण परिसरातील रहिवासी होती. तो मुंबईतली एलटी मार्ग परिसरात दुकान चालवतो. अमीन आणि मनीष हे एकमेकांना 20 वर्षांपासून ओळखतो. मनीषचे देखील त्याच परिसरात दुकान होते. मनीषने 2017 रोजी अमनीकडून पैशांची गरज असल्यामुळे पैसे मागितले. आणि तीन ते चार टप्प्यांत अमीनने त्याला 52.20 लाख रुपये दिले. अमीनने तक्रारीत म्हटले आहे की,मी मनीषकडून गेल्या वर्षांपासून पैसे मागत आहे, परंतु त्याच्याकडून पैश्यांची व्यवस्था होत नसल्याचे खोटी बतावणी केली. तो आणखी वेळ मागत राहिला.

त्यानंतर अमीनने त्याच्या वकिलामार्फत पैसे परत करण्यासाठी नोटीस पाठवली होती. त्याने या नोटीसचे उत्तर म्हणून अशी नोटीस पाठवली की, 52.20 लाख ही कर्जाची रक्कम नसून ती, रक्कम फॅब्रिक खरेदीसाठी दिली होती. या घटनेचा घोळ आणखीन वाढू लागला. अमीनने आरोप फेटाळून काढून, आझाद मैदान पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली.मनीष याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 406 (गुन्हेगारी भंग), 420 (फसवणूक),465 (बनावट) यासह अन्य कलमांखाली एफआयआर नोंदवला असून त्याला अटक केले आहे.