मीरा रोड: अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन वेश्या व्यवसायत ढकलणाऱ्या चार बहिणींना पोलिसांकडून अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

अल्पवयीन मुलींचे मुंबई (Mumbai) येथून अपहरण करुन राजस्थान (Rajasthan) येथे वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या चार बहिणींना आणि त्यांच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. तर पोलिसांना एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन मीरा रोड येथे आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना गुप्त माणसांकडून सांगण्यात आले. त्यानुसार वसईतील रेल्वे पोलिसांनी याबाबत अधिक माहिती मिळाली.

या प्रकरणी पोलीस उत्तम सोनावणे यांनी असे सांगितले की, रिमा, सुमन, रितू आणि निर्मल या चारही जणी यापूर्वी मुंबई आणि मीरा-भायंदर येथील बार डान्सरमध्ये बारबाला म्हणून कार करत होत्या.तसेच त्यांचा भाऊ अमन हा सुद्धा या प्रकरणात सहभागी असून तो मुंबईतील अल्पवयीन मुलींचे अपहरण करायचा. अपहरण करण्यासाठी अमन मुंबईतील रस्त्यांवर एकट्या दिसणाऱ्या मुलींना कपडे आणि खाण्याचे अमिष दाखवून पळवून घेऊन जायचा. त्यानंतर तो या मुलींना राजस्थान मधील टोंक जिल्ह्यातील नेहारवाडा येथे आणत असे.

तसेच अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींवर बळजबरीने डान्स शिकण्याची सक्ती करण्यात येत होती. त्यानंतर या मुलींना राज्यातील प्रायव्हेट पार्टीमध्ये मुजरा करण्यासाठी पाठवण्यात येत होते. या मुलींना खासकरुन मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ग्राहकांसमोर डान्स करण्यास सांगण्यात आले होते.(नागपूर: डान्सबारमध्ये अल्पवयीन तरुणाईचे अश्लील चाळे, पोलिसांनी धाड टाकत 57 जणांना घेतले ताब्यात)

पोलिसांनी असे म्हटले आहे की, या सर्व बहिणी आणि त्यांचे अन्य साथीदार 200 पासून डान्सबार बंद झाल्यापासून काहीच काम करत नव्हत्या. त्यामुळेच त्यांनी अल्पवयीन मुलींना बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकलण्याची शक्कल लढवली.यासाठी त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या ग्राहकांशीसुद्धा संपर्क साधला. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानच्या रहिवाशी असलेल्या या चारही जणींना अटक केली असून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. तसेच 14 सप्टेंबर पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.