नागपूर: डान्सबारमध्ये अल्पवयीन तरुणाईचे अश्लील चाळे, पोलिसांनी धाड टाकत 57 जणांना घेतले ताब्यात
डान्सबार (संग्रहिचित्र)

नागपूर (Nagpur) येथे एका डान्सबार मध्ये काही अल्पवयीन तरुण मुलामुलींचे चाळे सुरु असतानाच पोलिसांनी धाड टाकली. यामध्ये पोलिसांनी 57 ग्राहक आणि अनेक अल्पवयीन मुलींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वांची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

झीरो डिग्री असे बारचे नाव असून तो रात्रीपासून ते पहाटे पर्यंत बेकायदेशीर पद्धतीने सुरु असतो. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या बारव धाड टाकली. या बारमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याचा प्रकार समोर आला. तर पोलिसांनी टाकलेल्या अचानक धाडीमुळे सर्वांची पळापळ झाली. मात्र पहाटेपर्यंत अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करण्यात येत असल्याचे सत्य समोर आले.(नंदूरबार स्टेशनजवळ गणपती पूजेदरम्यान लोकांच्या मनोरंजनासाठी बार डान्सरची छमछम, व्हिडिओ व्हायरल Video)

या प्रकारामुळे नागपूर मधील तरुणवर्ग अशा प्रकारच्या माध्यमातून गुन्हेगारीकडे वळत असल्याची भीती आता निर्माण झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळेस मुले कुठे जातात याची सुद्धा माहिती असावी असे आवाहन पोलिसांनी पालकांना केले आहे.