स्पाइसजेटच्या सुरत-मुंबई विमानात शुक्रवारी चार महिन्यांच्या बालिकेचा पहाटे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहापूर येथे राहणाऱ्या प्रीती जिंदाल या आपली चार महिन्याची बालिका रियाला घेऊन मुंबईला येण्यासाठी पहाटे साडेपाच वाजता विमानात चढल्या. त्यानंतर प्रीती यांनी रियाला दूध पाजले. त्यानंतर थोड्यावेळातचं रिया झोपी गेली. (हेही वाचा- गोव्यात भारतीय नौदलाचं 'मिग 29 के' लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलट सुखरूप)
प्रवासादरम्यान मुलगी हालचाल करीत नसल्याचे प्रीती यांना जाणवले. झोपेमुळे कदाचित रिया हालचाल करत नसेल, असं रिया यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी विमानातील कर्मचाऱ्यांना त्याविषयी माहिती दिली नाही. परंतु, विमान 8 वाजता मुंबईच्या विमानतळावर उतरल्यावर त्यांनी ही बाब अधिकाऱ्यांना कळवली. त्यानंतर रियाची विमानतळावरील वैद्यकीय कक्षात तपासणी करण्यात आली.
तपासणी झाल्यानंतर तिला नानावटी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अद्याप रियाच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही. रियाच्या मृत्यूमुळे जिंदाल कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अनेकदा विमानात अशा प्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे विमानातून प्रवास करताना काळजी घेणं आवश्यक आहे.