गोव्यात भारतीय नौदलाचं 'मिग 29 के' लढाऊ विमान कोसळलं; सुदैवाने पायलट सुखरूप
Navy MiG-29K crashes (PC - IANS)

गोव्यात भारतीय नौदलाचं (Indian Navy) 'मिग 29 के' (MiG-29K) हे लढाऊ विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने हे विमान निर्मनुष्य भागात कोसळले. त्यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच विमानातील दोन्ही पायलट सुखरूप आहेत. (हेही वाचा - नगर-इंदूर महामार्गावर अपघात; खड्डे चुकवताना पुणे-अक्कलकुव्वा एसटी बस पलटी, बसमधील प्रवासी जखमी)

गोव्यातील वेर्णा औद्योगिक वसाहतीजवळ सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या विमानाने गोव्यातील आयएनएस हंसा हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. या विमानाला एका पक्षाने धडक दिली. त्यामुळे विमानाच्या इंजिनने पेट घेतला.

IANS ट्विट - 

 

या अपघातग्रस्त विमानात दोन पायलट होते. इंजिनला आग लागल्याचं समजताच विमानातील दोन्ही पायलट पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले. लेफ्टनंट कमांडर दीपक यादव आणि कॅप्टन एम. शेवखंड अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.