Latur Earthquake: लातूर (Latur) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत चार भुंकपाचे धक्के बसले आहे. भुकंपाच्या धक्कांमुळे जिल्ह्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील हासोरी येथील उस्तुरी भागात ही धक्के जाणवले आहे. हे धक्के सौम्य असले तरी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांत ही चौथ्यांदा धक्के जाणवले आहे. धक्कादायक म्हणजे गेल्यावर्षी याच भागात दोन महिन्यात नऊ धक्के जाणवले होते.
बुधवारी 4 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजून 57 मिनिटांनी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. अहवालानुसार गेल्या वर्षी देखील भूकंपाचे धक्क जाणवले. एक नव्हे तर ९ धक्के जाणवले होते. त्यामुळे नागरिकांना आता भीतीच वाटू लागली आहे. बुधवारी जावलेल्या धक्के भूकंपमाकावर तीव्रता १.६ रिश्टर स्केल नोंदवण्यात आला आहे. हासोरी आणि उस्तुरी भागामध्ये हे धक्के जाणवत असल्याची माहिती मिळाली आहे.
नागरिकांनी याची माहिती प्रशासनाला देहूनही प्रशासनाकडून याची दखल घेतली गेलेली नाही. फक्त एकच धक्का बसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर ग्रामस्थांनी ४ धक्के बसल्याचे सांगितले. यावर्षी 2 ऑक्टोबरला तीन धक्के जाणवले होते. सद्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंपाच्या धक्क्याची माहिती प्रशासनाला कळताच तलाठी बबन राठोड, नायब तहसीलदार अनिल धुमाळ यांनी गावात येत माहिती घेतली.