Mumbai News: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या मुंबई विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणांचा पर्दाफाश केला आहे. या घटनेअंर्तगत पोलिसांनी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 31 किलोग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. ड्रग्जच्या तस्करीचे प्रमाण वाढत चालेल आहे. हेही वाचा- मुरुमगावातून २० लाखांचा गांजा जप्त;
एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाकोर्टिक्स कंट्रोल ब्युरोला गुप्त विशेष माहिती मिळाली होती की, गांजा तस्करीत गुंतलेले दोन लोक 14 फेब्रुवारी रोजी एलटीटी रेल्वे स्थानकावर येणार आहेत. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने सापळा रचून आणि दोघांना पकडले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातून 31 किलोग्राम गांजा जप्त केला आहे.चौकशीतून असे उघड आले की, आरोपी दोघांनी ओडिशातून आणल्याचे उघड झाले आहे. चौकशीतून आणखी दोन आरोपी तरुणांची माहिती उघड केली आहे.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना या घटनेअंतर्गत पकडले आहे. आरोपींना रविवारी कोर्टात हजर केले असता एनसीबीने त्यांची कोठडी मागितली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, एनसीबीच्या मुंबई विभागीय युनिटने भारतातून ऑस्टेलियात फार्म ड्रग्जच्या अवैध तस्करीमध्ये गुंतलेल्या आंतरराष्ट्रीय नेटकर्वचा यशस्वीपणे पर्दाफाश केला होता. यावेळी एजन्सीने ३ कोटी रुपयांचे जप्त केले असून या घटनेअंतर्गत तिघांना अटक केले आहे.