Former Shiv Sena MLA Vijayraj Shinde joins BJP (PC - File Photo)

Former MLA Vijayraj Shinde: बुलडाण्याचे शिवसेनचे माजी आमदार तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते विजयराज शिंदे (Former MLA Vijayraj Shinde) यांनी भाजपाची (BJP) वाट धरली आहे. विजयराज शिंदे यांनी आज आपल्या असंख्य समर्थकांसह माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री संजय कुटे, जिल्हा अध्यक्ष आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले, योगेंद्र गाडे हे उपस्थित होते.

कट्टर शिवसैनिक म्हणून वियजराज शिंदे यांचे नाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर घेतले जाते. तालुका प्रमुख ते बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार अशी त्यांची कार्यकिर्द आहे. विजयराज शिंदे व समर्थकांना वंचित बहुजन आघाडी घुसमटल्यासारखे वाटू लागले. भविष्यातील राजकीय निवडणूकांचा वेध घेवून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमध्ये जाण्याचा याशिवाय हिंदुत्ववादी भाजपात प्रवेश करावा, अशा त्रिधा मनःस्थितीत त्यांनी मतदार संघातील विविध पक्ष संघटनेतील मित्रांचे सल्ले घेतले. (हेही वाचा - Raigad Building Collapse: महाड इमारत दुर्घटनेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अजित पवार, अनिल देशमुख, आदी नेत्यांनी व्यक्त केल्या सद्भावना)

अखेर आज त्यांनी भाजपात प्रवेश केला. विजयराज शिंदे हे तीन टर्म शिवसेनेचे आमदार होते. आज त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, अर्जूनराव दांडगे, शिवसेना महिला आघाडी प्रमुख सिंधुताई खेडेकर, श्रीकृष्ण मोरे, कांताबाई राजगुरे, तुकाराम राठोड, पुरूषोत्तम नारखेडे, पुरूषोत्तम नारखेडे, पुरूषोत्तम लखोटिया, मा. सोफियान भाई, राजेश सुरपाजने, गणेशराव पाटील, संजय नागवंशी, सचिन शेळके, सुनील काटेकर, अशोक किन्हळकर, रहिम शाह, समाधान राऊत या नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आजी, माजी सदस्यांनी सुद्धा यावेळी भाजपात प्रवेश केला.