नवी मुंबई च्या माजी पोलीस आयुक्तांची COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबईचे (Navi Mumbai) माजी पोलीस आयुक्त संजय कुमार (Sanjay Kumar) यांची कोरोनाची चाचणी (Coronavirus Test) शुक्रवारी पॉझिटिव्ह आली आहे. संजय कुमार यांची बदली करत त्यांना ADG पदभार देण्यात आला आहे. कुमार यांनी त्यांच्या पदाचा कारभार नवे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांच्याकडे सोपवला आहे. कुमार यांनी ट्वीट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट केले आहे.(Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, जाणून घ्या एका क्लिकवर)

संजय कुमार यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व खबरदारी घेतली होती. तसेच आयुर्वेदिक आणि होमेपेथिकसह अन्य गोष्टी केल्या तरीही कोविड19 चा संसर्ग मला झाला आहे. यामुळे अंगदुखी, ताप, थंडी भरुन येणे आणि घश्याचे इंन्फेक्शन ही झाले. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. पुढील एका आठवडाभरात रुग्णालयातून सोडले जाईल अशी शक्यता ही त्यांनी व्यक्त केली आहे.

गुरुवारी नवी मुंबईत कोरोनाचे आणखी 335 रुग्ण आढळून आले आहेत. त्याचसोबत 7 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नवी मुंबईत एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 27,112 वर पोहचला आहे. तसेच बेलापूर येथे 71, नेरुळ 73, वाशी 51, तुर्भे 42, कोपरखैराणेत 32, घणसोलीत 23, ऐरोलीत 37, दिघा येथे 6 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सध्या नवी मुंबईत कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे.(जळगाव: रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलावर आईला हातगाडीवरुन रुग्णालयात नेण्याची वेळ)

दरम्यान, राज्यात काल  दिवसभरात 18,105 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 लाख 43 हजार 844 वर पोहोचली आहे. गुरुवारी राज्यातील 391 नवे रुग्ण दगावले असून राज्यात कोरोना संक्रमित मृतांचा आकडा 25,586 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्ण देखील बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने रिकव्हरी रेट 72.58% इतका झाला आहे. राज्यात काल दिवसभरात 13,988 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 6 लाख 12 हजार 484 वर पोहोचली आहे.