Parambir Singh Case: मुंबई पोलिसांकडून जीवाला धोका; परमबीर सिंह यांच्या वकिलाचा सर्वोच्च न्यायालयात दावा
Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

मुंबईचे माजी गृहमंत्री परमबीर सिंह (Param Bir Singh) हे फरार नाहीत. तर ते केवळ लपून बसले आहेत. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ते लपून बसल्याचा दावा परमबीर सिंह यांच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तब्बल 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात पुढे इडीचाही प्रवेश झाला असून, अनिल देशमुख सध्या ईडीच्या ताब्यात आहे. त्यांना अटक झाली आहे. दरम्यान, आरोप आणि तक्रारकर्ते परमबीर सिंह मात्र गायब आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषीत केले आहे.

परमबीर सिंह हे पुढील 48 तासांमध्ये सीबीआय अथवा इतर कोणत्याही कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तीवादही वकिलांनी केला आहे. वकिलांनी दावा करताना न्यायालयात म्हटले की, परमबिर सिंह फरार नाहीत. त्यांना कोठोही पळून जायचे नाही. केवळ त्यांच्या जीवाला मुंबई पोलिसांकडून धोका आहे. त्यांना मुंबई पोलिसांकडून धमकी मिळाली आहे. त्यामुळे ते लपून बसले आहेत, असेही परमबीर सिंह यांचे वकील कोर्टात म्हणाले. (हेही वाचा, Third Non-Bailable Warrant Against Param Bir: मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात परमबीर सिंग यांच्याविरुद्ध तिसरे अजामीनपात्र वॉरंट जारी)

परमबीर सिंह हे अनेक समन्स बजावूनही चौकशी समितीसमोर उपस्थित राहात नाहीत. तसेच, ते कोठे आहेत याचा पत्ताही लागत नाही. त्यामुळे त्यांना फरार घोषीत करावे अशी मागणी मुंबई पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. मुंबई पोलिसांनी केलेल्या अर्जाला परवानगी देत परमबीर सिंह यांना फरार घोषीत करण्यास न्यायालायने कोणताही आक्षेप घेतला नाही. दरम्यान, न्यायालयाने हिरवा कंदील दाखवतातच परमबीर सिंग, रिजाय भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांना फरार घोषीत करण्यात आल्यापासून पुढील 30 दिवसांमध्ये हजर होण्यासाठी मुदत दिली आहे. परमबीर सिंह हे जर 30 दिवसांच्या मुदतीत हजर नाही झाले तर त्यांची संपत्ती सील करण्याचे आदेश राज्य सरकारला प्राप्त होणार आहेत.