Uddhav Thackeray, Sanjay Pandey (File Image )

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे(Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) यांच्यात भेट झाली आह. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी ही भेट झाली. ज्या भेटीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्याबद्दल राजकीय वर्तुळात आणि पोलीस वर्तुळातही उलटसुलट चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात संजय पांडे हे मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सवेत होते. दरम्यानच्या काळात ते निवृत्त झाले आणि एका प्रकरणात त्यांना सीबीआयने अटकही केली. नुकताच त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर ते मोतोश्रीवर आले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोघांमध्ये साधारण एक तासभर चर्चा झाल्याचे वृत्त एबीपी माझाने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असताना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधील काही अधिकारी आणि कर्मचारी यांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याच प्रकरणात त्यांना जुलै 2022 मध्ये अटक झाली होती. दरम्यान, काही महिन्यांनी (डिसेंबर 2022) मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

सीबीआयने संजय पांडे यांच्यावर आरोप ठेवला होता की, त्यांनी iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन जवळपास आठ वर्षे बेकायदेशीरपणे टॅप केले. ही कंपनीसुद्धा संजय पांडे यांचीच असून ती रेड सर्व्हर नावाचे उपकरण वापरत असे, असा सीबीआयचा आरोप होता. त्यातूनच त्यांना अटक करण्यात आली होती.

दुसऱ्या बाजूला संजय पांडे हे राज्याचे पोलीस महासंचालक असताना त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर अनिल देशमुख यांच्या विरोधात दाखल आरोप मागे घेण्यासाठी दाबव टाकला होता असाही आरोप त्यांच्यावर होता. चित्र रामकृष्णा प्रकरणातही एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती. जी संजय पांडे यांचीच होती, असाही आरोप करण्यात आला होता. त्यांना NSE सर्व्हर कॉप्रमाईज प्रकरणात समन्सही बजावण्यात आले होते. त्यांनी सन 2001 मध्ये आपल्या सेवेचा राजीनामाही दिला होता. मात्र, तो स्वीकारण्यात आला नव्हता. त्यानंतर त्यांनी आपल्या आई आणि मुलाला आपल्या कंपनीमध्ये संचालक केले. विविध प्रकरणात ईडी आणि सीबीआय या केंद्रीय तपास संस्थांनी संजय पांडे यांच्या विरोधात चौकशी सुरु केली होती. दरम्यान, त्यांना अटक झाली. पुढे न्यायालयाने त्याना जामीनही मंजूर केला.