भाजप संलग्न माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांना चतु:श्रृंगी पोलिसांनी पत्नी उषा काकडे (Usha Kakade)यांच्यासह गुरुवारी (5 ऑक्टोबर) अटक केली. काकडे दाम्पत्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्यांची जामीनावर सुटका झाली. युवराज ढमाले (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी काकडे दाम्पत्याला अटक केली होती. पोलिसांचे एक पथक काकडे यांना अटक करण्यासाठी बुधवारीच (4 ऑक्टोबर 2020) त्यांच्या घरी गेले होते. परंतू, ते घरी सापडले नाहीत. त्यामुळे मग पोलिसांनी गुरुवारी पुन्हा एकदा काकडे यांच्या घरी जाऊन कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, युवराज ढमाले हे काकडे यांचे महुणे आहेत. काकडे आणि ढमाले यांच्यात जुना कौटुंबीक वाद आहे. या वादातून काकडे यांनी ढमाले यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ढमाले यांनी काकडे यांच्याविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाईक करत काकडे दाम्पत्याला ताब्यात घेतले.
दरम्यान, अटक केल्यावर पोलिसांनी काकडे यांच्यावर दोषारोपपत्र सादर केले. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने काकडे दाम्पत्याला जामीन मंजूर केल्यावर त्यांची सुटका झाली. विजयसिंह ठोंबरे यांनी वकील म्हणून युवराज ढमाले यांची बाजू मांडली. (हेही वाचा, Assembly Elections Results 2018: राम मंदिर सोडा, विकासाच्या मूळ मुद्द्याकडे परत फिरा: खा. संजय काकडे)
दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत बोलताना संजय काकडे यांनी सांगितले की, आमचा हा कौटुंबीक वाद आहे. या प्रकरणात माझे आणि पत्नीचे साधे बोलणेही झाले नाही. असे असताना तक्रारदाराने दोन वर्षांपूर्वी धमकी दिल्याचा आरोप आता का केला याचे आश्चर्य वाटते. या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे. तुर्तास 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंजूर झाला आहे. आम्ही न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करती असल्याचेही काकडे या वेळी म्हणाले.