Ganapati Immersion 2020: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवासस्थानीच केले गणपतीचे विसर्जन; पाहा संपूर्ण व्हिडिओ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील अनेक धार्मिक, सास्कृतिक आणि समाजिक कार्यक्रम रद्द किंवा लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरी करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, यावर्षी करोना साथीचे संकट असल्यामुळं गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारकडून गणेश विसर्जनसंबंधित नियमावली तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे बरेच जण घरातच गणपती विसर्जन करताना दिसत आहेत. यातच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील गणपतीचे विसर्जन आपल्या निवासस्थानी केले आहे. तसेच कोरोनाचे संकट लवकर संपो, अशी मनोभावे प्रार्थना केली आहे.

कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट आणखी गडद होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता यावर्षी 85-90% गणेशभक्तांनी घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन केले आहे. तसेच गणपती विसर्जनासाठी खास सोय, फिरते हौद, कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले आहेत. नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळत गणपती बाप्पाला निरोप देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे देखील वाचा- Ganesh Visarjan 2020: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची शहरातील गणेश विसर्जन सोहळ्याला हजेरी; पहा फोटो

ट्विट- 

कोरोना काळातील गणशोत्सव हा सामाजिक भान राखून शांततेने साजरा करण्यात यावा. तसेच या कोरोनाच्या काळात गर्दी होणार नाही, कोरोना विषाणूनची प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच गाफील न राहता आतापर्यंत ज्या उपाययोजना सुरु असून यापुढेही राबावाव्यात, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले होते. त्यांच्या अवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.