Ganesh Visarjan 2020: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी शहरातील गणेश विसर्जन सोहळ्यास हजेरी लावली. यावेळी सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे (Joint CP Ravindra Shisve) हे देखील उपस्थित होते. आज सर्वत्र गणेश विसर्जनाचा (Ganesh Visarjan Ceremony) उत्साह दिसत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेश विसर्जन सोहळ्यासाठी गर्दी न करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुरलीधर मोहोळ यांनी परंपरेप्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन पुष्पहार अर्पण करत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश विसर्जनाला सुरुवात केली. याशिवाय यंदा मंगलमूर्तींचे विसर्जन घाटावर नव्हे तर घरातचं करा, असं आवाहनदेखील मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. 'बाप्पा, कोरोनाच्या संकटातून पुणेकरांची लवकरात लवकर सुटका कर,' अशी प्रार्थनाही मोहोळ यांनी केली आहे. (हेही वाचा - Ganesh Visarjan 2020: मुंबईतील केवळ 'या' मंडळांच्या गणेश मूर्तींचे समुद्रात होणार विसर्जन, वाचा सविस्तर)
Maharashtra: Pune Mayor Murlidhar Mohoi attends Ganesh Visarjan ceremony in the city, bringing 10-days of festivities to an end. Joint CP Ravindra Shisve also attended the ceremony. pic.twitter.com/yk5bAHGyfH
— ANI (@ANI) September 1, 2020
पुण्यनगरीचं ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री. कसबा गणपतीचं पुणेकरांच्या वतीनं दर्शन घेऊन विसर्जनाला सुरुवात केली. परंपरेचा भाग म्हणून काही पावले पुढे जात मांडपात तयार केलेल्या कृत्रिम हौदात सकाळी साडे अकरा वाजता विसर्जन संपन्न झाले. pic.twitter.com/VjWqtUbqiU
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) September 1, 2020
पुण्याच्या विसर्जन मिरवणूकीला विशेष संस्कृती आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करीत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. त्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी सर्व पुणेकरांचे आणि सार्वजनिक गणेश मंडळाचे आभार मानले.