माजी आमदार माणिकराव जगताप (Manikrao Jagtap) यांचे निधन झाले आहे. ते 54 वर्षांचे होते. रविवारी (25 जुलै) मध्यरात्री 12 च्या सुमारास मुंबई येथे त्यांनी अल्पशा आजारात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव जगताप (Manikrao Jagtap Passes Away) हे महाडचे (Mahad) माजी आमदार होते. काँग्रेस पक्षाचे तडफदार नेते अशी त्यांची ओळख होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Maharashtra Pradesh Congress) कमिटीचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. महाराष्ट्र काँग्रेसने (Congress) आपल्या ट्विटर हँडलवरुन माणिकराव जगताप यांच्या निधनाची माहिती दिली आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळातून जगताप यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दु:ख व्यक्त केले आहे. जगताप यांच्या पार्थिवावर महाड येथे आज (26 जुलै) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
माणिकराव जगताप हे महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले होते. 2004 ते 2009 या काळाते या मतदारसंघातून आमदार होते. ते काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाध्यक्ष होते. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.
महाड नगरपालिकेच्या राजकारणात माणिकराव जगताप यांचा मोठा वरचष्मा होता. साधार 15 ते 20 वर्षे इतका प्रदीर्घ काळ त्यांनी महाड नगरपालिकेवर वर्चस्व कायम ठेवले होते. रायगडमध्ये सुनिल तटकरे यांच्या रुपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम असताना. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनिल तटकरे यांना आव्हान देणारा रायगड जिल्ह्यातील प्रमुख नेता अशी त्यांची ओळख होती. दक्षिण रायगड भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
महाराष्ट्र काँग्रेस ट्विट
महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक असून कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. pic.twitter.com/tzc3VskS76
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) July 26, 2021
काँग्रेस आणि इतरही राजकीय पक्षातील नेत्यांकडून आणि माणिकराव जगताप यांच्या आप्तेष्ठांकडून निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. काँग्रेस पक्षाने दु:ख व्यक्त करताना म्हटले आहे की, ''महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक असून कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.''महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचे वृत्त धक्कादायक असून कॉंग्रेस पक्षाने कर्तृत्ववान व उमदे नेतृत्व गमावले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत''.
सत्यजित तांबे ट्विट
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
आमचे मार्गदर्शक, उत्तम वक्ते, उत्तम संघटक, रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, माज़ी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन झाले आहे.
मी जगताप परीवाराच्या विशेषत: त्यांची कन्या आमची बहिण महाडची नगराध्यक्षा स्नेहल व चिरंजीव श्रीयश यांच्या दुःखात सहभागी आहे. pic.twitter.com/1pblDIPK4v
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 26, 2021
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन म्हटले आहे की, ''आमचे मार्गदर्शक, उत्तम वक्ते, उत्तम संघटक, रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, माज़ी आमदार माणिकराव जगताप यांचे अकाली निधन झाले आहे. मी जगताप परीवाराच्या विशेषत: त्यांची कन्या आमची बहिण महाडची नगराध्यक्षा स्नेहल व चिरंजीव श्रीयश यांच्या दुःखात सहभागी आहे.''