'सध्याचे विरोधीपक्षनेते कदाचित गजणी झालेत' राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्याकडून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या सुरूवातीपासून भाजपने (BJP) आक्रमक भुमिका घेतल्याचे दिसत आहे. याशिवाय शेतकरी कर्ज माफी आणि महिला सुरेक्षा संदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता टोला लगावला आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजणी झालेला दिसतोय असा आशायाचे ट्वीट रुपाली चाकणकर यांनी केले आहे. यामुळे पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रूपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

भाजपने महिला अत्याचाराविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झाले. महिला अत्याचाराविरोधात सरकार ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा पवित्रा कायम राहील, असा इशाराही फडणवीसांनी दिला. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी माजी मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले आहे. माजी मुख्यमंत्री व गृहमंत्री, सध्याचे विरोधी पक्षनेते कदाचित आपला गजणी झालेला दिसतोय. आपल्याच काळात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसरे क्रमांकावर होते, असे म्हणत रूपाली चाकणकर यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केल होते. तसेच आजचे आंदोलन हे तुमच्या अपयशाचा आरसा आहे. चोराच्या उलट्या बोंबा....हे तंतोतंत आपण पालन करत आहात असेही त्यांनी म्हटलआहे. याशिवाय 2016 ते 2018 या काळात महिलांवर झालेल्या अत्याचारांचा आकडाही त्यांनी सादर केला आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाला लाभ?

रुपाली चाकणकर यांचे ट्वीट-

भाजप सत्तेत असताना त्यांनी महिला अत्याचार प्रतिबंध कठोर आणले नाहीत. याच आपल्या कर्माचे फळ आज महाराष्ट्र भोगतोय, अशी टीका चाकणकर यांनी केली आहे. 2016 ते 2018 या काळात 31, 126 महिला अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठकारे कोणती भुमिका घेतील? हे येत्या काळात सर्वांना कळेल.