किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याची धमकी, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना लिहिले पत्र; शिवसेनेवर गंभीर आरोप
Kirit Somaiya, Governor Bhagat Singh Koshyari |

Kirit SomaiyaThreatens To Kill: भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार (Former BJP MP) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा केला आहे. सत्तेत आल्यानंतर शिवसेनेकडून आपल्याला ही धमकी आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. आपणास आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीबाबत आपण राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) आणि राज्याच्या गृहसचिव यांना पत्र लिहून माहिती दिल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. शिवसेना (Shiv Sena) पक्षाने मात्र सोमय्या यांनी केलेल्या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

किरीट सोमय्या यांच्या हवाल्याने एबीपी माझा या वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या वृत्तवाहिनीकडे बोलताना सोमय्या यांनी 'आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही. आम्ही आमचे काम सुरुच ठेवणार. परंतू, सुरक्षिततेसाठी आपण राज्यपाल आणि राज्याचे गृहसचिव यांना याबाबत माहिती दिली', असे म्हटले आहे. (हेही वाचा, जामिया मिलिया इस्लामिया येथे जे घडले ते जालियांवाला बागसारखे- उद्धव ठाकरे)

दरम्यान, आलेल्या धमकीबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही माहिती दिली आहे का? असे विचारले असता आपण मुख्यमंत्र्यांना अशी माहिती दिली नाही. मात्र, आमचे (भाजप) विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्याचे सोमय्या यांनी म्हटले.