पुण्यात (Pune) चाकण (Chakan) मधील एमआयडीसीत (MIDC) 7 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यामध्ये वन विभगाला यश आलं आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास त्याला कैद करण्यात आले आहे. बिबट्या पकडल्याचं वृत्त समजताच कंपनीतील कामगारांसोबतच वन विभाग आणि पोलिसांचाही जीव भांड्यात पडला. मीडीया रिपोर्ट्सनुसार हा बिबट्या अडीज वर्षांचा आहे. वन विभागाने त्याला पकडल्यानंतर दूर जंगलात सोडलं आहे.
चाकण एमआयडीसी मध्ये मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये पहाटे सुरक्षा रक्षकाला बिबट्या दिसला होता. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वन विभाग आणि पोलिसांना माहिती देऊन बिबट्याला शोधण्यासाठी मोहिम सुरू करण्यात आली.
पुण्याच्या विविध भागात यापूर्वीदेखील बिबट्या अनेक ठिकाणी मानवी वस्ती मध्ये दिसला आहे. उसाच्या शेतीच्या भागात मागील काही वर्षांत बिबट्यांचा वावर अधिक वाढला आहे. कात्रज बोगद्यामध्येही बिबट्या दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. हे देखील नक्की वाचा: Leopard Attack: इगतपूरी येथे 55 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला .
महाराष्ट्रात काही ठिकाणी मानवी वस्तीमध्ये बिबट्या घुसल्याने त्याने लोकांवर हल्ले केल्याच्या घटना देखील ताज्या आहेत. यामध्ये काहींनी आपले जीव देखील गमावले आहेत. त्यामुळे आता वाढतं शहरीकरण आणि कमी होत चाललेली जंगलं यामुळे अशा घटना राज्यात अनेक ठिकाणी समोर येत आहेत.