अभियंता विद्यार्थी तरुणीची (Engineering Girl Student) अश्लील चित्रफीत (Porn Clip) यू-ट्यूब व पॉर्न साइटवर (Porn Site) अपलोड करुन खंडणी उकळण्याचा धक्कादायक आणि तितकाच किळसवाणा प्रकार नागपूर (Nagpur) शहरात उघडकीस आला आहे. नागपूर पोलीसांनी (Nagpur Police) फिरोज अब्दुल रहीम अन्सारी ऊर्फ अॅन्ड्र्यू अॅण्डरसन ऊर्फ मार्टिन डिक्रुझ (वय २९, रा. जमशेदपूर) नावाच्या आरोपीस दिल्ली येथून या प्रकरणात अटक केली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलीसांनी हायटेक तपास प्रणाली वापरली. या प्रकरणात दोन आरोपींना आगोदरच अटक करण्यात आली आहे. डॉ. अभयकुमार ब्रिजकिशोर प्रसाद (वय ३९, रा. लोहियापुरा, पाटणा) व नौफल पी. पी. कुजीयन पुलीकरमबिल (रा. वैलातूर, मल्लपूरम) अशी त्या दोघांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, फिरोज हा कुवेतमध्ये जनरेटर दुरूस्तीचे काम करतो. नुकतेच त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. अभयकुमार ब्रिजकिशोर प्रसाद याने फिरोज अब्दुल रहीम अन्सारी ऊर्फ अॅन्ड्र्यू अॅण्डरसन ऊर्फ मार्टिन डिक्रुझ याच्या मदतीने कट करुन अभियंता तरुणीस खंडणीसाठी कट करुन फसविले. विशेष म्हणजे पीडित तरुणी ही डॉ. अभयकुमार याची प्रेयसी असल्याची चर्चा आहे. डॉ. अभयकुमार हा विवाहीत आहे. त्याचा आणि त्याचा पत्नीचा वाद आहे. डॉ. अभयकुमार हा हुंड्यासाठी आपला छळ करतो असा आरोप करत त्याच्या पत्नीने तक्रार दिली आहे. त्याबाबतचा खटला न्यायालयात सुरु आहे. न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याच्या खर्चामुळे अभयकुमार हा कर्जाच्या ओझ्याखाली होता. दरम्यान, अभयकुमार याचे एका अभियंता तरुणीशी (पीडिता) प्रेमसंबंध जमले. तरुणीही अभयकुमार याच्या प्रेमात डुंबली. नेमकी हित संधी साधत त्याने प्रेयसीलाच गंडा घालण्याचे ठरविले. त्यासाठी प्रेयसीने त्यांचे संबंध चांगले असताना विश्वासाने पाठवलेल्या अश्लील चित्रफीतीचा वापर करण्याचे ठरवीले.
डॉ. अभयकुमार याने फिरोज अब्दुल रहीम अन्सारी ऊर्फ अॅन्ड्र्यू अॅण्डरसन ऊर्फ मार्टिन डिक्रुझ या च्यासोबत संगनमत करुन अभियंता तरुणीकडून आणि तिच्या कुटुंबीयांकडून खंडणी उकळण्याचे ठरवले. अभियंता तरुणी ही पुढील शिक्षणासाठी स्वीडनला जाणार होती. याची अभयकुमार याला कल्पना होती. तरुणीकडे पैसे असणार याचा अंदाज अभयकुमार याला आलाच होता. त्याने अभियंता तरुणी आणि तिचे कुटुंबीय आपल्याला 25 लाख रुपये देऊ शकतात असे सांगत तिच्या कुटुंबीयांची माहिती फिरोज याला दिली. (हेही वाचा, प्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज)
दरम्यान फिरोज याने फेसबुक, ट्विरर, युट्यूब आदी प्रकारच्या सोशल मीडियाचा वापर करत तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तसेच, आपण स्वीडन येथे राहात असून, पॉर्न चित्रपटांमध्ये अभिनेता असल्याचेही त्याने तिला सांगितले. पुढे, तो तिच्याशी सतत चॅटद्वारे बोलू लागला. पुढे त्याने तिला तिच्या काही अश्लील चित्रफिती पाठविण्यास सांगितले. तरुणीने त्याला स्वत: 12 अश्लील चित्रफीती पाठवल्या. यातील एक चित्रफीत तरुणीने अभयकुमार यालाही पाठवली होती.
दरम्यान, फिरोज याने या तरुणीकडे खंडणी मागण्यास सुरुवात केली. त्याने तिच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. इतकेच नव्हे तर, एकूण 12 चित्रफितींपैकी पाच चित्रफीती यू-ट्यूब व अन्य सोशल मीडियावर अपलोडही केल्या. घडला प्रकार लक्षात येताच तरुणाला मोठा धक्का बसला. तिने तातडीने पोलिसांच्या सायबर सेलकडे धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी . प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणात डॉ. अभयकुमारासह याच्यासह दोघांना अटक केली. मात्र, या प्रकणातील फिरोज अब्दुल रहीम अन्सारी ऊर्फ अॅन्ड्र्यू अॅण्डरसन ऊर्फ मार्टिन डिक्रुझ हा आरोपी फरार होता. हायटेक तपास प्रणाली राबवत पोलिसांनी त्याला नवी दिल्ली विमानतळावर अटक केली. सध्या त्याची रवनगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. मात्र, राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील नागरिकांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे.