Tuljapur Mandir ( Photo Credits: tuljabhavanipujari.com)

शबरीमला मंदिरामध्ये (Sabarimala Temple) अय्यप्पाच्या दर्शनाची महिलांना परवानगी मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातील तुळजापूर मंदिरामध्येही (Tuljapur Mandir) महिलांनी देवीच्या गाभाऱ्यात  जाऊन चरणस्पर्श केला आहे. आजवर स्त्रियांना मंदिरात प्रवेश असला तरीही कोणत्याच भाविकाला  गाभाऱ्यात  जाण्याची परवानगी नव्हती. काही महिलांनी जिल्हाधिकाऱयांना भेटून मंदिराच्या गाभाऱ्यात  महिलांनी जाऊ नये याबाबत काही नियम आहेत का? अशी विचारणा केली. मात्र तशाप्रकारचा कोणताच नियम नसल्याने रात्री काही महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवीला चरणस्पर्श केला.

तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजापूरची आई भवानी प्रसिद्ध आहे. भवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदैवत आहे. असं मानलं जातं की स्वराज्याच्या स्थापनेसाठी भवानीने महाराजांना तिची तलवार आशीर्वाद म्हणून दिली. हे मंदिर साऱ्यांसाठी खुलं असलं तरीही गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नव्हता. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देखील या मंदिरामध्ये गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला नव्हता. महाराष्ट्रातील देवीची असलेली साडे तीन शक्तिपीठं

शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असली तरीही स्थानिक भाविकांचा मात्र त्याला विरोध आहे. जानेवारी महिन्यात काही महिलांनी या मंदिरात प्रवेश करून शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली.