
एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या (Murder) झाल्यामुळे भुसावळ (Bhusawal) शहर हादरुन गेले आहे. ही घटना भुसावळ शहरातील आंबेडकरनगरमध्ये (Ambedkar Nagar) घडली आहे. रात्री उशीरा भाजप नगरसेवक (BJP Corporater) रविंद्र खरात यांच्या घरात घुसल्यानंतर चार जणांनी अंदाधुंद गोळीबार करत त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेवून त्यांची कसून चौकशी करत आहेत. या हत्याकांड मागचे नेमके कारण काय? अद्याप समजू शकले नाही. परंतु, राजकीय वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
जळगाव जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या झाल्यामुळे जवळील परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री उशिरा दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात लोकांनी रविंद्र खरात यांच्या घरात घसून त्यांच्यावर दगड, विटा आणि चाकूने हल्ला केला. परंतु, या हल्ल्याला खरात कुंटुंबियांनी प्रत्त्युत्तर दिले असता एका अरोपीने त्याच्यासोबत आणलेल्या बंदुकीने अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात करुन तिथून पळ काढला. या हल्ल्यात रविंद्र खरात यांच्यासह पत्नी दोन्ही मुले आणि त्यांचा भाऊ सुनील यांच्या मृत्यू झाला. हे देखील वाचा-धक्कादायक! 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी
या गोळीबारात खरात यांच्यासह कुटुंबातील ५ जणांना तातडीने जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यापैंकी तिघांचा मृत्यू झाला तर, रविंद्र यांच्यासह एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.