Fire (PC - File Image)

Pune Fire: पुणे शहरातील येरवाड्यात लाकडी साहित्याच्या गोदामाला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे शहरातील वाघोली परिसरात वाहनांचे स्पेअर पार्ट असलेल्या गोदामाला आग लागली आहे. या दोन्ही घटनेमुळे पुण्यात अग्नितांडव पाहायला मिळत आहे. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (हेही वाचा- तेलंगणातील तेल गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येरवड्यातीला बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच सर्व जळून खाक झाले आहे. घटनेची माहिती अग्निशमनदलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाले आहेत.  आगीचे नेमके कारण अद्याप समजले नाही. आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

वाघोलीत गोदामाला आग

पुण्यातील वाघोलीत असलेल्या वाहनांचे स्फेअर पार्च असलेल्या गोदामाला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. परिसरातील गाडे वस्ती भागात वाहनांचे जुने स्पेअर पार्ट असलेल्या स्क्रॅप गोदामाला आग लागली. आगीची माहिती अग्निशमन दलाल देताच प्रशासनाचे बचाव कार्य सुरु झाले. अथक प्रयत्नांनतर आग विझवण्यात आली. आगीच्या दोन्ही घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.