Fire | (Photo Credit : ANI/Twitter)

पुणे (Pune ) शहरातील वानवडी परिसरातील शिवरकर वस्ती (Shivarkar Wasti Wanwadi) येथे भीषण आग गुरुवारी (10 नोव्हेंबर) रात्री उशिरा लागली. आगीच्या घटनेमध्ये महापालिकेच्या शिवरकर दवाखान्यासमोरील शिवरकर वस्तीत (Fire Broke In Wanavadi Out Pune) असलेली पत्र्यापासून नवलेली अनेक घरे जळून खाक झाली. रात्रीच्या वेळी नागरिक घरात झोपलेले असतानाच ही घटना घडली. आगीच्या झळांनी नागरिकांना जाग आली आणि ते घराबाहेर घाबरुन पळाले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. मालमत्तेचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे समजते.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्या आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. प्राप्त माहितीनुसार, पुणे माहापालिकेच्या अग्निशमन दलातील कोंढवा खूर्द येथील आणि इतर काही केंद्रातील अशा सर्व मिळून सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी ही आग आटोक्यात आणली. (हेही वाचा, Fashion Street Fire broke Out: मुंबईत फॅशन स्ट्रीट परिसरात आग, आगीवर नियंत्रण, मात्र कपड्यांची दुकाने जळाली, कोणतीही जीवित हानी नाही, व्हिडिओ व्हायरल)

ट्विट

प्राथमिक माहितीनुसार, वानवडी येथील एका खोलीला आग लागली. या खोलीत मंडपाचे सामना ठेवण्यात आले होते. वेळ रात्रीची असल्याने या परिसरातील नागरीक झोपले होते. दरम्यान, आगीची घटना घडली. आगीच्या ज्वाळांनी परिसरात धुराचे लोट उडाले. आगीच्या झळा झोपलेल्या नागरिकांनाही बसू लागल्या. त्यामुळे हे नागरिक घरातून बाहेर पळाले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. प्रसंगावधान राखत नागरिकांनी घरातील सिलिंडरही बाहेर काढली. त्यामुळे ही संभाव्य मोठी दुर्घटना घडली.

आग आटोक्यात आणली असली तरी नागरिकांच्या घरांचे मात्र मोठेच नुकसान झाले. प्रामुख्याने नागरिकांनी जमा केलेला संसार आणि संसारउपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. हातावर पोट असलेले हे संसार उघड्यावर आले. इतकी वर्षे काडी काडी जमा केलेला संसार डोळ्यासमोर जळून खाक होत असताना नागरिक आतडी पिळवटून रडत ओरडत होते.