Bandra Fire: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या राहत्या इमारतीला आग, कोणतीही जीवीतहानी नाही (Watch Video)
Fire PC TWITTER

Bandra Fire: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस राहत असलेल्या वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरातील नवरोज अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. आगीची माहिती मिळताच, चार फायर इंजिन, तीन जंबो टँकर आणि एक ब्रीदिंग उपकरण व्हॅन घटनास्थळी दाखल झाली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. (हेही वाचा-  उपवन येथील सूर संगीत हॉटेल आणि बारला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, )

मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवानेआतापर्यंत कोणतीही दुखापत झाले नाही. इमारतीच्या 13व्या मजल्यावरील स्वयंपाकघरात ही आग लागल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे. प्रथमदर्शींनी सांगितले की, आग बुधवारच्या रात्री ८ वाजता लागली. नवरोज अपार्टमेंटच्या 14व्या मजल्यावरील एका खोलीत ही आग लागली आहे. आग लागलताच लोकांनी आरडोओरड केले.

आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. आग विझवण्याचे काम सुरु आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुधवारी रात्री या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीमुळे काही प्रमाणात घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आगीमुळे धुरांचे लोट परिसरात पसल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट परसली आहे.