ठाणे: पूर्णा परिसरात गोडाऊनला आग; जीवित हानी टळली तरी मोठे नुकसान
Thane's Purna Area Godown Fire (Photo credits: ANI)

ठाणे (Thane) शहरातील पूर्णा परिसरात (Purna Area) आज सकाळच्या सुमारास एका गोडाऊनला आग (Fire) लागल्याचे वृत्त हाती येत आहे.सुरुवातीला ही आग छोट्या स्वरूपात असल्याने याबाबत कोणलाही कल्पना आली नाही मात्र काहीच वेळात आसपासच्या परिसरात धुराचे लोट वाहू लागताच स्थानिक नागरिकांचे लक्ष या घटनेकडे गेले. याबाबत माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान या प्रसंगात कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी घटनास्थळावरून समोर आलेल्या फोटो नुसार  गोडाऊनचे मात्र नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

ANI वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, आज सणाच्या निमित्ताने अनेकांना सुट्टी असल्याने याठिकाणी कामगार वा आजूबाजूच्या परिसरातही स्थानिकांची वर्दळ कमी होती. सुदैवाने यामुळेच जीवितहानी टळली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र विद्युत तारांचा शॉट सर्किट झाल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत.