Fire Break Out at Mumbra: मुंब्रा येथील कौसा पेट्रोल पंपाजवळील गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

ठाणे येथील मुंब्रा येथील परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना कौसा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या एका गोदामाला लागल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. तसेच अद्याप कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Mumbai Fire: क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल)

दरम्यान, काल सुद्धा मुंब्रा जवळील बायपास येथे एका प्लास्टिक पीवीसी फिटिंगचे सामान वाहून नेणाऱ्या एका कंटेनरला आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर रिजनल डिजास्टर मॅनेजमेंट सेल आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी  शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. तसेच या घटनेत सुद्धा जिवीतहानी झाली नाही.

Tweet: 

याआधी सुद्धा 14 ऑक्टोंबरला ठाण्यातील दिवा परिसरात असलेल्या एका दुकानाला मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी सुद्धा कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले होते. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली होती.