मुंबई: आर्थिक मंदीमुळे Lokhandwala Infrasturcture कंपनी दिवाळखोरीच्या यादीत; NCLT करणार कारवाई
Lokhanwala Builders Bankrupt (Photo Credits: File Image)

मुंबई (Mumbai) तील उच्चभ्रू इमारतींचे बांधकाम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या लोखंडवाला इन्फ्रास्ट्रक्चर (Lokhandwala Infrastructure) कंपनीला सुद्धा आता आर्थिक मंदीचा (Recession) जबर फटका बसला आहे. प्राप्त माहितीनुसार, NCLT तर्फे लोखंडवाला बिल्डरच्या विरुद्ध दिवाळखोरीचा (Insolvency And Bankrupcy) ठराव मांडणाऱ्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या अंतर्गत व्यवस्थापक, आर्थिक गुंतवणूकदार, ग्राहक व कर्मचाऱ्यांना ३ ऑक्टोबर पर्यंत आपलाकडील पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. NCLT च्या मुंबई विभागाने याबाबत 19 सप्टेंबर रोजी कारवाई सुरु करण्याचे निर्देश दिले असून पुढील वर्षी म्हणजेच 17 मार्च 2020 पर्यंत या प्रकरणी अंतिम निर्णय घेतला जाईल.

प्राप्त माहितीनुसार, शाहपूरजी पलोंजी रिअल इस्टेट ग्रुपवरील कारवाईनंतर लगेचच लोखंडवाला ग्रुपवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही ग्रुप्सने एकत्र येऊन महालक्ष्मी येथील एका प्रकल्पाची घोषणा केली होती. Economic Recession 2019: अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे, भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी, सत्याचा कोंबडा आरवलाय: शिवसेना

दरम्यान, आर्थिक मंदीमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे नव्याने घरे बांधण्यासाठी बाजारात गुंतवणूकदार तयार होत नाहीत आणि मध्यमवर्गीय महागाईमुळे घरे घेण्याची तयारी दाखवत नाहीत त्यामुळे व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. तुतरास या कंपनीने दिवाळखोरी जाहीर करत हात वर केल्याने या प्रकल्पाकडे आशेने पाहणाऱ्यांची मात्र निराशा झाली आहे.