Final Year University Exams 2020: मुंबई विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षा फॉरमॅट जाहीर केल्यानंतर  MASU ची परीक्षा सोप्या पद्धतीने घेण्याची मागणी
Exam | Representational Image (Photo credits: Pixabay)

सर्वोच्च न्यायालयाने कोरोना व्हायरसच्या सावटाखाली देखील यंदा पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊनच पदवी दान केले जावे हा युजीसीचा निर्णय कायम ठेवल्यानंतर आता महाराष्ट्र भर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवत परीक्षा कशा घेतल्या जाऊ शकतात यासाठी विचार विनिमय सुरू आहे. दरम्यान मुंबई विद्यापीठाने MCQ स्वरूपात प्रश्नावली देऊन ऑनलाईन पद्धतीने ती सोडवण्याचा परीक्षा फॉरमॅट जाहीर केल्यानंतर आता MASU म्हणजेच महाराष्ट्र स्टुडंट युनियनने आता परीक्षा सोप्या पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

मुंबईमध्ये यंदा पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या तयारीमध्ये असताना अनेक कॉलेजेस थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हाईडकडे गेले आहेत. तर अनेक ऑटोनोमस कॉलेजेस गूगल फॉर्म्स भरून घेऊन परीक्षा घेऊ शकतात. तसेच MASU ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी परीक्षा ऑनलाईन किंवा hybrid mode मध्ये घ्यावी अशी मागणी केली आहे. दरम्यान त्यांना ईमेल किंवा व्हॉट्सअ‍ॅप च्या माध्यमातून प्रश्नपत्रिका देण्याचं आवाहन केले आहे. यामध्ये मार्च महिन्यापर्यंतचा अभ्यासक्रम विचारात घ्यावा असं म्हटलं आहे. तसेच 13 non-agricultural public universities आणि ATKT परीक्षा सारख्याच पद्धतीने व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.

अनेक कॉलेजेस कडून ऑनलाईन परीक्षा घेताना गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच ती सुरक्षित होण्यासाठी online-proctoring software देखील वापरले जाऊ शकतात. त्यासाठी विचारणा झाली आहे.

महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी 31ऑक्टोबर पर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कुलगुरूंसोबत राज्याच्या राज्यपालांसोबतही मिटींग घेतली आहे.