कोरोना व्हायरसग्रस्तांची पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वाढती संख्या पाहता आता नागरिकांना आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान या स्थितीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आगामी तीन दिवसांसाठी पुणे शहरातील सारे बाजार व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 17,18,19 मार्च या तीन दिवसांसाठी घाऊक आणि किरकोळ व्यापारांनी आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सुमारे 40 हजार दुकानं बंद राहणार आहेत. यामध्ये किराणा माल आणि मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश नसेल. दरम्यान काल (16 मार्च) पुणे शहरामध्ये कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. सोबत शाळा, कॉलेज, चित्रपटगृह, नाट्यगृह 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे व्यापारी महासंघामध्ये सुमारे 82 विविध व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधी आहेत. होजिअरी, स्टेनलेस स्टील, कापड, संगणक, इलेक्ट्रोनिक वस्तू ते खेळणी, केमिकल विक्रेते यांमधील व्यावसायिक सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान पुणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेऊन 19 नंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. सध्या पुण्याच्या श्रीमंत दगडुशेठ गणेश मंदिर देखील दर्शनासाठी बंद करण्यात आले असून गुढी पाडवा, रामनवमी निमित्तचे विविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यामातून केली आकडेवारी जाहीर.
ANI TWEET
Federation of Trade Association of Pune has decided to close the trade market/shops for next 3 days (17,18 and 19 March), in the wake of #Coronavirus. This will exclude the daily essentials and medicines shops.
— ANI (@ANI) March 16, 2020
महाराष्ट्रात सध्या 39 कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. यवतमाळमध्ये 3 नवी मुंबई 3 मध्ये 1, पिंपरी चिंचवड मध्ये 9, पुणे मध्ये 7, मुंबई मध्ये 6, नागपूर मध्ये 4, कल्याणमध्ये 3, औरंगाबाद व अहमदनगर, रायगड, ठाणे मध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आहेत.