Mumbai News: नेहमीच्या भांडणाला कंटाळून बापाने उचलले टोकाचे पाऊल, मुलाला संपवलं, वाकोला येथील धक्कादायक घटना

मुंबई शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.

Close
Search

Mumbai News: नेहमीच्या भांडणाला कंटाळून बापाने उचलले टोकाचे पाऊल, मुलाला संपवलं, वाकोला येथील धक्कादायक घटना

मुंबई शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.

महाराष्ट्र Pooja Chavan|
Mumbai News: नेहमीच्या भांडणाला कंटाळून बापाने उचलले टोकाचे पाऊल, मुलाला संपवलं, वाकोला येथील धक्कादायक घटना
हल्ला | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai News: मुंबई शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांनी सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे. दरम्यान मुंबई शहरातील सांताक्रुझ परिसरातील वाकोला या भागात एका वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.रविवारी रात्री वडिलांचे मुलासोबत भांडण झाले होते त्याचा राग मनात धरत वडिलाने मुलाची हत्या केली आहे. या घटनेनं संपुर्ण वाकोला परिसर हादरला आहे. (हेही वाचा- चाकू घेऊन धावायचे, बाथरूममध्ये कोंडायचे; रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक

मिळालेल्या माहितीनुसार, वाकोल्यातील दत्तमंदीर रोड वरील वाघरी पाडा येथे ही घटना घडली. हत्या झालेला मुलगा आपल्या कुटुंबासोबत वाघरी पाडा येथे राहायचा. दिनेश गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. अलोक असं हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. अलोक आणि दिनेश मध्ये नेहमी भांडण होत असायचे. अलोक नेहमी उलट उत्तरे द्यायचा. या कारणावरून दोघांमध्ये वाद व्हायचा. परंतु हा वाद टोकाला गेला आणि मुलाची हत्या केली.

दिनेशने आलोकवर चाकूने हल्ला केला. चाकू हल्ल्यात अलोक गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला व्हि. एन देसाई रुग्णालयात दाखल केले पंरतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आलोकच्या पोटात चाकून घुसल्याने गंभीर जखम झाली होती. यात त्याला भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या घटनेनंतर वाकोला परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वाकोला पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केले. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change