Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

Farmers Protest: देशात गेल्या एक महिन्यांहून अधिक दिवस शेतकऱ्यांकडून केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. तर प्रजासत्ताक दिनाच्या वेळी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली असता त्याला हिंसक वळण लागल्याचे दिसून आले. या घटनेचे प्रतिसाद सर्वत्र उमटल्याचे ही दिसले. विरोधकांनी सुद्धा दिल्लीत झालेल्या हिंसाचारा बद्दल केंद्र सरकारला दोषी ठरवले आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज दुपारी दिल्लीतील गाझिपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची दुपारी 1 वाजता भेट घेणार आहे. याबद्दल संजय राऊत यांनी ट्विट सुद्धा केले आहे. त्यात राऊत यांनी असे म्हटले की, किसान आंदोलन झिंदाबाद! जय जवान, जय किसान.(Maharashtra-Karnataka Border Dispute: कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुनावले; सीमावादाच्या प्रश्नाचा अभ्यास करण्याचाही सल्ला)

पुढे राऊत यांनी असे म्हटले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या सुख दु:खात त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुचनेनुसार आज गाझिपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.(Farmers Protest: महाराष्ट्रातील सीताबाई तडवी यांचा दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात मृत्यू)

Tweet:

दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी बिलावरुन याआधी शरद पवार यांनी सुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुंबईत 25 जानेवारीला झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी केंद्र सरकारने संमत केलेले कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकार मधील नेते, मंत्र्यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.