Farmers Protest: दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक करण्यासह दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय, संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका
Sanjay Raut (Photo Credit: ANI)

Farmers Protest: फार्म बिलावरुन शेतकऱ्यांचे देशभरात जोरदार आंदोलन सुरु आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली चलो चा नारा देत दिल्लीत प्रवेश करण्याचा मार्ग निवडला आहे. मात्र या शेतकऱ्यांची सिंघु बॉर्डवर अडवणूक केली गेली आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे. राऊत यांनी असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांसोबत जी वागणूक केली जात आहे त्यामधून असे दिसते की ते दहशतवादी आहेत. त्यांना खलिस्तानी असल्याचे म्हटले जात आहे. हा त्यांचा झालेला अपमान आहे.

राऊत यांनी असे ही म्हटले की, शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखले गेले आहे. त्यामुळे असे वाटते की ते या देशाचे नाहीत. त्यांच्यासोबत दहशतवाद्यांसारखा व्यवहार केला जात आहे. हिच चूक आहे की ते सिख असून पंजाब आणि हरियाणा येथून आल्याने त्यांना खलिस्तानी बोलले जात आहे.(Farmers Protest: शेतकरी आंदोलनामुळे विमान चुकलेल्या प्रवाशांना Air India चा दिलासा; दुसरी फ्लाईट पकडता येणार)

दरम्यान, कृषी कायद्यासंबंधित सातत्याने तिसऱ्या दिवशी ही शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरु ठेवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रस्ताव मानण्यास शेतकरी मान्य नाही. शेतकरी जर शांतपणे ते बुराडीतील निरंकारी मैदानात शिफ्ट झाल्यास सरकार त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांच्यासोब बातचीत करणार आहे.

शनिवारी रात्रभर दिल्ली-हरियाणाला जोडणाऱ्या सिंघु बॉर्डवर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले. शेतकऱ्यांनी कालच स्पष्ट केले होते की, ते येथून जाणार नाहीत. आज पुन्हा सिंघु बॉर्डवर शेतकऱ्यांनी बैठक पार पडत असून पुढील रणनीतिवर चर्चा केली जाणार आहे.