आज,7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नाशिक (Nashik) मधील देवलाली (Devlali) स्टेशन येथुन बिहार (Bihar) च्या दानापुर (Danapur) साठी पहिली वहिली किसान स्पेशल पार्सल ट्रेन (Kisan Special Parcel Train) चालवण्यात आली आहे. केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंंसिंगच्या माध्यमातुन या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेतुन सुरु झालेल्या या प्रकल्पातुन देशातील शेतकर्यांंच्या हिताचे काम होईल असा विश्वास गोयल यांनी ट्विट करुन व्यक्त केला. या माध्यमातुन भाजी, फळ, दुध, मांस- मच्छी, सारखी कृषी उत्पादने ही थेट उत्पादनाच्या ठिकाणहुन शेतकर्यांकरवी बाजारासाठी पाठवता येतील.यामुळे शेतकर्यांची आर्थिक मिळकत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे असेही गोयल यांनी म्हंट्ले आहे. दरम्यान हा उपक्र्म कसा काम करणार आहे याविषयी जाणुन घेउयात..
किसान स्पेशल पार्सल ट्रेन ही सध्या तरी आठवड्यातुन एकदा चालवली जाईल, कालांंतराने या गाडीच्या फेर्या वाढवल्या जातील. आठवड्यातुन ठराविक दिवशी सकाळी 11 वाजता नाशिक मधील देवलाली स्थानकातुन सोडण्यात येईल जी पुढच्या दिवशी संध्याकाळी 6:45 पर्यंत बिहार च्या दानापुर स्थानकात पोहचेल. किसान रेल्वेच्या 1519 किमी प्रवासासाठी 31 तास आणि 45 मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे.
किसान स्पेशल पार्सल ट्रेन शुभारंभ लाईव्ह
किसान हित में चलाई जा रही देश की पहली #KisanRail का शुभारंभhttps://t.co/svp3tWVp8S
— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 7, 2020
दरम्यान, सध्या मध्य रेल्वे भुसावळ डिव्हिजन मधील शेतकर्यांंना फायदा होणार आहे. या भागात उगवल्या जाणार्या फळ, भाजी, फुल, दुधाला बिहार.अलहाबाद येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पेरिशेबल म्हणजेच कमी वेळेत खराब होणार्या वस्तुंंची अधिक मागणीच्या ठिकाणी निर्यात करण्यासाठी हा उपक्रम सुरु केलेला आहे. या वस्तु या ट्रेन मधुन फ्रोजन कंटेनरचा वापर करुन डिलिव्हर केल्या जाणार आहेत.
नाशिक मध्ये हा उपक्रम सुरु होत असताना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे, या माध्यमातुन नक्कीच शेतकर्यांंची मदत होईल असे म्हणत भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत, या शुभारंभ वेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.