Farmer Meets Chief Minister Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या नव्या सरकारकडून प्रत्येकी 2 लाख रुपये कर्जमाफी देण्यात आली. परंतु, आता एक शेतकरी मात्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेला आहे. त्याच्या डोक्यावर 17 लाख रुपयांचं कर्ज असल्याने कर्जेही संपूर्ण रक्कम भरण्यासाठी बँक त्याच्यामागे लागली आहे. धनाजी वसंतराव जाधव असं या शेतकऱ्याचं नाव असून या कर्जबाजारी शेतकऱ्याने नुसती मुख्यमंत्र्यांच्या भेटच घेतली नाही तर उद्धव ठाकरे यांना भेटायला जाताना सोबत अंत्यसंस्काराचं साहित्यही नेलं होतं.
धनाजी वसंतराव जाधव या शेतकऱ्याच्या नावे आयडीबीआय बँकेचे 17 लाख रुपयांचे कर्ज आहे. आणि या कर्जापोटी बँकेने धनाजी जाधव यांनी तब्बल 1 कोटी 50 लाख रुपये किमतीची जमीन ओलीस ठेवली आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
ते असंही म्हणाले की ते जमीन विकून बँकेचे कर्ज फेडण्यासाठी तयार आहेत परंतु बँक त्यांना ना जमीन विकू देत आहे ना जमिनीची कागदपत्रं परत देत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या संदर्भातील वृत्त टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिली आहे.धनाजी जाधव हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गावाहून मुंबईकडे आले आहेत. जर त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले नाही तर त्यांनी येताना सोबत अंत्यसंस्काराची सामान देखील आणले आहे असे सांगितले.
आता गोरगरिबांना मिळणार 10 रुपयांत शिवभोजन; शिवसेना पक्षाच्या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता
दरम्यान, आता त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आहे. त्यांची संपूर्ण अडचण ऐकल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.