प्रसिद्ध अशी शेगाव कचोरी (Shegaon Kachori) आता भारतीय रेल्वेतही मिळणार आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेच्या IRCTC विभागाने शेगाव रेल्वे स्थानकात आता एक रेल्वे कोच रेस्टॉरंटही (Railway Coach Restaurant) सुरु केले आहे. या रेस्टॉरंटमध्ये आता प्रसिद्ध शेगाव कचोरीवर ताव मारता येणार आहे. शेगाव हे संत गजानन महाराज यांचे समाधी स्थळ आहे. त्यामुळे शेगावमध्ये गजानन महाराजांचे भक्त राज्य आणि देशविदेशातूनही येतात. त्यामुळे शेगाव हे प्रसिद्ध आहे. दुसऱ्या बाजूला कचोरीमुळेही शेगाव प्रचंड प्रसिद्ध आहे.
शेगाव कचोरीबद्दल कहाणी सांगितली जाते की, भारताची फाळणी झाल्यानंतर सन 1950 मध्ये एक गृहस्थ पाकिस्तानातून भारतामध्ये आले. तिरथराम करमचंद शर्मा असे या गृहस्थांचे नाव. या गृहस्थांनी कचोरी बनवून विकण्याचा व्यवसाय सुरु केला. कचोरीची चव आणि शर्मा यांची व्यावसायिक बांधिलकी यांमुळे हळूहळू शेगाव कचोरी प्रसिद्ध होत गेली. आजही तिरथराम शर्मा यांचे अनेक वंशज शेगावमध्ये कचोरी विक्रीचा व्यवसाय करतात. पण या सर्वांच्या कचोरीचे नाव मात्र टी.आर. शर्मा कचोरी असेच आहे. (हेही वाचा, Noodles Viral Video: अरेरे! नूडल्स असे बनवतात? व्हिडिओ पाहाल तर कदाचित खाण्याचीही इच्छा मरेल)
शेगावमध्ये 1050 पासून विकली जाणारी ही प्रसिद्ध कचोरी पूर्वी रेल्वेत मिळत असे. मधल्या काळात ती बंद झाली होती. मात्र, आता ती पुन्हा रेल्वेत विकली जाणार आहे. विशेष असे की, या वेळी मात्र ही कचोरी पहिल्यापेक्षा अधिक ग्लॅमरस रुपात पाहायला मिळेल. ही कचोरी 'रेल्वे कोच रेस्टॉरंट' मध्ये उपलब्ध असणार आहे. हे रोस्टॉरंटही वातानुकुलीत आणि अत्याधुनिक सेवांनी युक्त असणार आहे.
शेगाव
शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील एक शहर आहे. हे श्री गजानन महाराज मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. जे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो भाविक उपस्थित असतात. हे मंदिर हिंदू संत श्री गजानन महाराज यांना समर्पित आहे आणि ते या प्रदेशातील सर्वात आदरणीय देवस्थानांपैकी एक आहे.
मंदिराव्यतिरिक्त, शेगाव समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि इतिहासासाठी देखील ओळखले जाते. शहरात आनंद सागर आणि संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासह इतर अनेक मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत. आनंद सागर हे एक मोठे संकुल आहे ज्यामध्ये एक सुंदर बाग, एक संग्रहालय आणि एक मोठा तलाव आहे.
शेगाव हे त्याच्या स्वादिष्ट स्थानिक खाद्यपदार्थांसाठी देखील ओळखले जाते, ज्यात कचोरी, पोहे, मिसळ पाव आणि भाकरी यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हे शहर रस्ते आणि रेल्वेने चांगले जोडलेले आहे आणि मुंबई आणि पुणे यांसारख्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधून सहज प्रवेश करता येतो.