Fake Ghee From Animal Fat: जनावरांच्या चरबीपासून बनावट तूप निर्मिती, भिवंडी येथील बंद कत्तलखान्यातील कारखाना उद्ध्वस्त
Fake Ghee From Animal Fat | (Photo credit: archived, edited, representative image)

BNCMC News: तपू (Ghee) खरेदी करताना तुम्ही काय पाहता? किंमत, स्वाद, स्वच्छता की ब्रँड? तुम्ही घाऊक बाजारात तूप खरेदी करता की किरकोळ? हे प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे भिवंडी (Bhiwandi News) येथे उघडकीस आलेली घटना. येथील एका कत्तलखान्यात चक्क म्हैस आणि रेड्यांच्या चरबीपासून तूप निर्मिती (Fake Ghee From Animal Fat) केली जात असे. हे तूप अत्यंत बनावट असून त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. हा गोरखधंदा सुरु असलेला कत्तलखाना पाठिमागील प्रदीर्घ काळापासून बंद होता. मात्र, या बंद इमारतीतच हा जीवघेणा प्रकार सुरु होता. जो भिवंडी महापालिका (Bhiwandi Police Station) प्रशासनाने केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आला. पालिका प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरुन भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट तूपाची बाजारात विक्री, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

धक्कादायक म्हणजे म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून बनविलले हे बनावट तूप बाजारात विकले जात होते. खास करुन छोटी, मोटी हॉटेल्स, खानावळी आणि इतर ठिकाणीही या तूपाची विक्री सुरु होती. हे ग्राहकही स्वस्त:मिळत असल्याने या तूपाची खरेदी करत होते. मात्र, या तूपाच्या शुद्धतेबद्दल कोणीच खातरजमा केली नाही. मात्र, काही सजग नागरिकांकडून भिवंडी महापालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवरुन पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशावरुन पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी आपत्कालीन विभाग प्रमुख साकिब खर्बे आणि त्यांच्या आपत्कालीन विभागाच्या सहाय्याने या कत्तलखान्यावर छापा टाकला. या छाप्यात प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणावर तथ्य असल्याचे आढलून आले. (हेही वाचा, नाशिक जिल्ह्यात अंबड आणि म्हसरुळ मध्ये FDA च्या कारवाईत 12 लाख किमतीचा बनावट तूप आणि पनीरचा साठा जप्त)

तूपाने भरलेले डबे, जनावरांची चरबी, मोठ्या कढया जप्त

पालिका प्रशासनाने टाकलेल्या छाप्यावेळी बंद असलेल्या कत्तलखान्यात बनावट तूप निर्मितीचा उद्योग सुरु होता. या वेळी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बनावट तूपाने भरलेले डबे, जनावरांची चरबी, मोठ्या कढया आणि इतर साहित्य जप्त केले. भिवंडी शहरातील इदगाह साल्टर हाऊस परिसरात हा कत्तलखाना आहे. जो सध्या बंदावस्थेत आहे. अधिकाऱ्यांनी साहित्य जप्त केले असले तरी हा प्रकार करणारे आरोपी नेमके कोण आहेत. कोणाच्या आशीर्वादाने हे काम सुरु होते? यात काही मोठी नावे गुंतली आहेत का? याबाबत अद्याप तपशील पुढे आला नाही. (हेही वाचा, Edible Oil Adulteration: खाद्यतेलातील भेसळ कशी ओळखावी? FSSAI सांगीतली घरगुती युक्ती)

शुद्ध तूप कसे ओळखाल?

शूद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप तुम्ही घरच्या घरीही तपासून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही खरेदी केलेले तूप घ्या. ते तूप गरम करा. ते जर लगेच वितळले आणि तपकीरी रंगाचे झाले तर समजून जा तुप शुद्ध आहे. पण तुप गरम होण्यास विलंब लागला आणि त्याला फिकट पिवळा रंग आला तर समजून जा की ते भेसळयुक्त आहे.

शुद्ध तपू ओळकण्याची दूसरी पद्धत

ही पद्धत काहीशी वेळखाऊ आहे. त्यासाठी एक टेस्ट ट्यूब घ्या. त्यामध्ये एक चमचा तूप टाका. त्यात चिमूटभर साखर मिसळा. तपू आणि साखर योग्य प्रमाणात मिसळा. काही वेळाने जर ट्यूबच्या तळाला गुलाबी अथवा लाल रंग दिसला तर समजून जा तपू भेसळयुक्त आहे. यामध्ये वनस्पती तूप (डालडा) किंवा तत्सम कडक तूप यामध्ये मिसळले आहे.