देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील केशरी रेशन कार्ड धारकांसाठी रेशनवरील धान्य स्वस्त दरात देणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाउनच्या काळात काही समाजकंटकांकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. याच दरम्यान आता सोशल मीडियात सर्व रेशन कार्ड धारकांना 50, 000 रुपयांचे अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना सुरु केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.
राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना सुविधा भारतातील जेष्ठ नागरिक, विधवा महिला, शेतकरी, कामगार, रेशनकार्ड धारकांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच व्हायरल झालेल्या मेसेज मध्ये ही योजना फक्त 40 हजार जणांसाठी उपलब्ध असून पहिल्या येणाऱ्या व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल असे ही लिहिण्यात आले आहे. मात्र PIB महाराष्ट्र यांनी राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजनेबाबतचा मेसेज खोटा असल्याचा खुलासा केला आहे. तर सरकारच्या वतीने अशी कोणतीही योजना सुरु करण्यात आलेली नाही. वैयक्तिक माहिती/शुल्क घेणाऱ्या अशा खोट्या आणि फसव्या संकेतस्थळांपासून सावध रहा असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.(CKP बँक ठेवीदारांना RBI कडून मोठा धक्का, बँक तोट्यात चालल्याने परवाना रद्द)
दावा: सर्व रेशनकार्ड धारकांना 50000 रुपयांचे अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने राष्ट्रीय शिक्षित बेरोजगार योजना सुरू केली आहे#PIBFactCheck :सरकारच्या वतीने अशी योजना सुरू करण्यात आली नाही. वैयक्तिक माहिती/शुल्क घेणाऱ्या अशा खोट्या आणि फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहा pic.twitter.com/5GQw1enUpl
— PIB in Maharashtra 🇮🇳 #MaskYourself 😷 (@PIBMumbai) May 2, 2020
दरम्यान, केशरी रेशन कार्ड धारकांना दिलासा देणारी ठरणार आहे. राज्यातील तब्बल 3 कोटी केशरी रेशन कार्डधारकांना 3 किलो गहू 8 रुपये प्रति किलो तर 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलोने वितरीत करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता केशरी राशन कार्ड (Saffron Ration Card) धारकांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्यातील एकूण कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने हा निर्णय घेतला आहे.