The CKP Co-operative Bank ठेवीदारांना RBI कडून मोठा धक्का, बँक तोट्यात चालल्याने परवाना रद्द
The CKP Co-operative Bank (Photo Credits: Twitter)

सीकेपी बँक (The CKP Co-operative Bank) ठेवीदारांना RBI कडून धक्कादायक बातमी मिळाली आहे. ही बँक गेल्या काही महिन्यांपासून तोट्यात चालली असल्यामुळे या बँकेचा परवाना गुरुवारी रात्री रद्द करण्यात आला आहे. RBI ने हा निर्णय घेतला असून यामुळे बँकेतील 11 लाखांहून अधिक ठेवीदारांना तसेच लाखांहून अधिक खातेदारांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे ठेवीदार तसेच खातेदार मोठ्या आर्थिक अडचणीत येण्याची शक्यात निर्माण झाली आहे.

दादर मध्ये मुख्यालय असलेल्या सीकेपी बँकेचा तोटा वाढत चालला होता. त्यामुळ् 2014 मध्ये बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध देखील आणले होते. हा तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न देखील चालू होते. मात्र RBI ने या बँकेचा परवाना रद्द केल्याने ठेवीदार चिंतेत आहेत.Coronavirus: RBI कर्मचाऱ्यांकडून PM Cares Fund साठी 7.30 कोटी रुपयांची मदत

रिझर्व्ह बँक 2014 पासून सातत्याने बँकेवरील निर्बंधांना मुदतवाढ देत आहे. आता अलिकडील मुदतवाढ 31 मार्चला देण्यात आली. ती 31 मे रोजी संपणार होती. त्याआधीच रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला. परवाना रद्द केल्याच्या वृत्ताला मुंबईचे विभागीय सहकार सह आयुक्त संतोष पाटील यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

तसेच ही परिस्थिती पूर्ववत आणण्यासाठी आणि बँक पुन्हा उभी राहण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असे ठेवीदार फोरमचे अध्यक्ष व माजी संचालक राजू फणसे यांनी मटा शी बोलताना सांगितले. तसेच अन्य बँकांना CKP बँकेला पैशास्वरुपी मदत करावी असे आवाहनही केले आहे.