इंटरनेटच्या माध्यातून 'सोशल मीडिया'वरील अभासी जगात घडणारे वादविवाद जीवघेणे ठरु लागले आहेत. अशीच घटना मुंबईतील घाटकोपर येथे घडली. फेसबुक पोस्टवरुन सुरु झालेला वाद विकोपाला गेला. या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणात हत्या झालेल्या युवकाचे नाव मनोज दुबे असे असून, तो काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. मनोज याच्या हत्या प्रकरणात भाजपचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी काही भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचेही समजते.
दरम्यान, घाटकोपर येथील असल्फा परिसरात ही घटना रविवारी रात्री अडीच वाजणेच्या सुमारास घडली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस आमदार नसीम खान यांच्याबाबत टीकात्मक मजकूर असलेली फेसबुक पोस्ट एक तरुणाने रविवारी शेअर केली होती. या पोस्टवरुनच वादाला तोंड फुटले. दरम्यान, हा वाद पुढे वाढण्यापूर्वी मनोज दुबे आणि त्याच्या ग्रुपमधील काहींनी टीकात्मक मजकूर शेअर करणाऱ्या व्यक्तिला समजावले. मात्र, फेसबुकवरील हा वाद अधिकच वाढत गेला.(हेही वाचा, स्वतःचा जीव धोक्यात घालून अमृता फडणवीस यांनी घेतला सेल्फी; व्हिडीओ व्हायरल)
दरम्यान, रविवारी रात्री दीडच्या सुमाराल मनोज दुबे याची हत्या झाल्याचे पुढे आले. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर तातडीने हजेरी लावली. त्यानंतर प्राप्त माहितीच्या अधारे काही संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या हत्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांपैकी सर्वच्या सर्व आरोपी भाजपचे कार्यकर्ते असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. हे सर्व आरोपी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचे समजते.
आरोपींची नावे
सुनील दुबे, उमेश सिंह, आकाश शर्मा अशी आरोपींची नावे आहे. साकीनाका पोलीस पुढील तपास करत आहेत.