स्वतःचा जीव धोक्यात घालून अमृता फडणवीस यांनी घेतला सेल्फी; व्हिडीओ व्हायरल
अमृता फडणवीस (Photo credit : Cine Buster Magazine)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे एक फॅॅशनिस्टा म्हणून पहिले जाते. विविध सामाजिक कार्यक्रमांंमधील त्यांची उपस्थिती नेहमीच लक्ष वेधून घेते. मुख्यमंत्रीन बाई सोशल मिडीयावर देखील चांगल्याच सक्रीय आहेत. गाणी, व्हिडीओ यांद्वारे त्या मनोरंजन क्षेत्रातही कार्यरत आहेत. आता एका नवीन गोष्टीमुळे अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत ती म्हणजे 'सेल्फी', तोही स्वतःचा जीव धोक्यात घालून काढलेला. याच सेल्फीप्रेमामुळे त्या आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

मुंबई-गोवा क्रुझ पर्यटन सेवा सुरु करण्यात आली. भाऊचा धक्का येथून आंग्रिया ही क्रुझ गोव्याच्या दिशेने रवाना झाली. या कार्यक्रमाला अमृता फडणवीसही हजर होत्या. त्यावेळी त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. आता मिसेस सीएम यांचं सेल्फी प्रेम समजून घेता येऊ शकतं पण क्रुझच्या अगदी टोकाला जाऊन, धोकादायक ठिकाणी त्यांनी सेल्फी का काढला? याचीच आता चर्चा सुरु झाली आहे. त्या एकट्याच अगदी टोकावर गेल्या आणि तिथे त्यांनी सेल्फी काढला. त्यांच्या सेल्फी प्रेमाचं कौतुक करायचं की जीव धोक्यात घातला म्हणून डोक्यावर हात मारून घ्यायचा या संभ्रमात पोलीस पडल्याचं दिसून आलं.