फोटो सौजन्य- Pixabay

घणसोली येथे एका ई- शौचालयामध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. तर या स्फोटामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे.

घणसोली सेक्टर सात येथे मराठी शाळेच्या जवळ असेल्या सुलभ शौचालयामध्ये अचानक आग लागली. त्यामुळे शौचालयामध्ये आलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर या स्फोटामुळे शौचालयाचे पत्रे आणि काचा दूरवर फेकल्या गेल्या. तर आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना याचा फटका बसला असून त्यांच्या घराच्या काचा फुटल्या आहेत. तर अग्रिशमन दलाने ही आग मात्र नियंत्रणात आणल्याने त्यामध्ये जास्त जण जखमी झाले नाही आहेत. मात्र शौचालय पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

या घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत. तसेच स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.