मुंबईमध्ये माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma, Ex Navy Officer) यांना मारहाण केल्याप्रकरणी 6 आरोपींना आज (15 सप्टेंबर) पुन्हा न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली होती. मात्र त्यानंंतर लगेचच बोरिवली कोर्टातुन (Borivali Court) या सहाही आरोपींंना प्रत्येकी 15 हजार रुपयांंवर जामीन मंंजुर करण्यात आला आहे.याशिवाय पोलिसांंच्या सुचनेनुसार त्यांंना कोणत्याही पोलिसांंसमोर उपस्थित राहावे लागेल असेही सांंगण्यात आले आहे. काल रात्री समता नगर पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्हांमध्येच कलम 452 ची भर घालत आरोपींना पुन्हा अटक करण्यात आली होती. आज सकाळी त्यांना बोरिवली येथील न्यायालयामध्ये (Borivali Court) हजर करण्यात आले त्यावेळेस न्यायलयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी संपूर्ण देशाची माफी मागावी- माजी नौदल अधिकारी मदन शर्मा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टुन सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप द्वारा शेअर केलेल्या मदन शर्मा यांंना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे कमलेश कदम आणि 5 अन्य शिवसैनिकांवर आरोप आहेत. 12 सप्टेंबरला याप्रकरणी पहिल्यांंदा सहा जणांना अटक झाली होती ज्यानंतर लगेजच जामीनावर त्यांची सुटका झाली.
दरम्यान, भाजपा नेत्यांनी मुंबईत आंदोलनं करत अजामिनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलिसांना केले होते. तसेच केंद्रीय मंंत्री रामदास आठवले यांंनी सुद्धा मदन शर्मा यांंची भेट घेत त्यांंना आपणही आपल्या पक्षासहित पाठिंंबा देत असल्याचे सांंगितले होते.
ANI Tweet
Mumbai's Borivali Court granted bail to all the six accused, on a bail bond of Rs 15,000 each. The Court also said that they will have to appear before the Police whenever they are summoned: Kamlesh Yadav, lawyer of the accused https://t.co/JVAkcQsrKS
— ANI (@ANI) September 15, 2020
दुसरीकडे मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळेस सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी त्यांनी केली होती, काही दिवसांंपुर्वी माध्यमांंसमोर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांंना राज्य चालवणे जमत नसल्यास त्यांंनी राजीनामा द्यावा आणि कायदा व सुव्यवस्था जपु शकेल असे सरकार लोकांंना निवडु द्यावे असे मदन शर्मा यांंनी म्हंंटले होते.