मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोनिया गांंधी (Sonia Gandhi) व शरद पवार (Sharad Pawar) यांंच्या फोटोसमोर हात जोडुन उभे असलेले चित्र शेअर केलेल्या निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांंना शिवसैनिकांंनी मारहाण केल्याचा मुद्दा सध्या बराच वादात आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांंनी सुद्धा काही वेळापुर्वी मदन शर्मा यांंची भेट घेऊन झाल्या प्रकाराची निंंदा केली आहे. शर्मा यांंनी चित्र शेअर केले होते शिवसैनिकांंना जर राग होता तर त्यांंनी चित्र काढणार्याशी बोलायला हवे होते, मुख्य मुद्दा म्हणजे जे चित्र शर्मा यांंनी शेअर केले त्यात काहीही गैर नसुन तेच वास्त्व होते. शिवसेनेच्या संजय राउत (Sanjay Raut) यांंनी खरोखरच कॉंंग्रेस आणि NCP समोर हात जोडुन त्यांंचा पाठिंंबा मिळवला होता. अशा प्रकारे एका निवृत्त अधिकार्याला मारहाण करणे हे गैरच आहे आणि त्यांंना न्याय मिळावा यासाठी आपण गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांंची सुद्धा भेट घेणार आहोत असे आठवले यांंनी माध्यमांंना सांंगितले आहे.
दुसरीकडे मदन शर्मा यांंच्यावर हल्ला केलेल्या शिवसैनिकांंना तात्काळ जामीन सुद्धा देण्यात आला. पोलिसांंनी त्यांंच्यावर साधी कलमे लावली होती त्यामुळे हा जामीन दिला गेला आहे, मात्र त्यांंचे कृत्य हे अधिक गंंभीर आणि तितकेच चुकीचे आहे, असेही आठवले यांंनी म्हंंटले आहे.
पहा व्हिडिओ
Watch: Union Minister @RamdasAthawale meets the Navy veteran Madan Sharma in Mumbai who was attacked by 'Sainiks'. pic.twitter.com/Bx5Qmcs4QP
— TIMES NOW (@TimesNow) September 13, 2020
दरम्यान, आठवले यांंनी संजय राउत यांंच्या मुंंबईवर महाराष्ट्राचा हक्क आहे या विधानाला योग्य म्हंंटले आहे, मुंंबई महाराष्ट्राची राजधानी असल्याने शहरावर सर्वात मोठा हक्क महाराष्ट्राचा आहे हे खरं असलं तरी मुंंबई बाहेरुन आलेल्यांंचे देखील मुंंबईच्या विकासात योगदान आहे, ते सर्वच मुंंबईकर आहेत त्यामुळे त्यांंचा हक्क मारणे हे सुद्धा चुकीचे आहे असे आठवले म्हणाले.