Retired Navy Officer Beaten in Maharashtra: नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ता कमलेश कदमसह अन्य पाच जणांना जामीन

मदन शर्मा असे त्यांचे नाव असून त्यांना मारहाण केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र आता त्यांना समता नगर पोलिसांकडून जामीन देण्यात आला आहे.

Retired Navy Officer Beaten in Maharashtra: नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ता कमलेश कदमसह अन्य पाच जणांना जामीन
मदन शर्मा (Photo Credits-ANI)

Retired Navy Officer Beaten in Maharashtra: मुंबईतील 66 वर्षीय माजी नौदल अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर शेअर केले होते. त्यामुळे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याची घटना काल उघडकीस आली होती. मदन शर्मा असे त्यांचे नाव असून त्यांना मारहाण केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते कमलेश कदम यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र आता त्यांना समता नगर पोलिसांकडून जामीन देण्यात आला आहे.(Retired Navy Officer Beaten in Maharashtra: मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला शिवसेनेच्या काही लोकांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात FIR दाखल)

मदन शर्मा यांची मुलगी शिला शर्मा हिने ANI ला सांगितले की, वडिलांनी एक मेसेज फॉरवर्ड केल्याने त्यांना धमक्या देण्यात आल्या. तसेच घरात घुसून सुद्धा त्यांना मारहाण केली. यावर मुलीने असे ही म्हटले की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी.(Retired Navy Officer Beaten in Maharashtra: सीएम उद्धव ठाकरे यांचे कार्टून फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाणWatch Video)

या प्रकरणी मदन शर्मा यांनी असे म्हटले की, आपल्या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. व्हॉट्सअॅप हे एखाद्या सोबत जोडण्यासह तेथे काही माहिती सुद्धा शेअर करता येते. तर सरकारने यासाठी काही तरी पाऊल उचलावे आणि मेसेज कुठून आला आहे त्याचा सुद्धा तपास करावा असे मदन शर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुःखद असल्याचे ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सएपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.’ असे त्यांनी ट्वीट करत म्हटले होते.

(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2020 12:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).