मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे व्यंगचित्र काढल्याप्रकरणी मुंबईतील 66 वर्षीय माजी नौदल अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांना काल शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात मदन शर्मा गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात शिवसेना कार्यकर्ते कमलेश कदम (Kamlesh Kadam) यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र आता त्यांना समता नगर पोलिसांकडून जामीन देण्यात आला. या सर्व प्रकाराने त्रस्त झालेले मदन शर्मा यांनी उद्धव ठाकरे यांच्या सर्व कार्यकर्तयांनी आणि संघटनांनी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी केलीय.
त्याचबरोबर असा प्रसंग दुस-या कोणासोबत होणार नाही याची ग्वाही द्यावी असेही मदन शर्मा यांनी मिडियाशी बोलताना सांगितले. 'मी खूप जखमी झालोय आणि मी प्रचंड तणावाखाली आहे. जे घडले ते अतिशय दु:खद होते' असेही ते म्हणाले. Retired Navy Officer Beaten in Maharashtra: नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे कार्यकर्ता कमलेश कदमसह अन्य पाच जणांना जामीन
All workers and organisations of Uddhav Thackeray ji should seek apology from the entire nation, that such incident does not take place again with anyone else: Madan Sharma, retired Navy officer https://t.co/hsrmMR5Lkf
— ANI (@ANI) September 12, 2020
'मी उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि लोकांना ठरवू हे पुढे कुणीही पाहावे ते' असेही ते म्हणाले.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय दुःखद असल्याचे ट्वीट केले आहे. ते म्हणतात, ‘एक अतिशय दुःखद आणि धक्कादायक घटना आहे. सेवानिवृत्त नेव्हीच्या अधिकाऱ्याने व्हाट्सएपवर संदेश पाठविल्यामुळे गुंडांनी त्यांना मारहाण केली. उद्धव ठाकरे कृपया हा गुंडाराज थांबवा. आम्ही या गुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो.’ असे त्यांनी ट्वीट करत म्हटले होते.