मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे आक्षेपार्ह्य चित्र शेअर केल्याच्या रागातुन शिवसैनिकांंनी 11 सप्टेंबर रोजी नौदलाचे निवृत्त अधिकारी मदन शर्मा (Madan Sharma) यांंना मुंंबईत मारहाण केली होती, याप्रकरणात मदन शर्मा यांंनी काही वेळापुर्वी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. जर जा उद्धव ठाकरे जी यांंना राज्य सरकार चालवता येत नसेल तर त्यांंनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व लोकांंनी निवडुन दिलेल्या आणि कायदा राखु शकेल अशांंना राज्य चालवु द्यावे असे मदन शर्मा यांंनी म्हंटले आहे, आपण शेअर केलेले कार्टुन हे आक्षेपार्ह्य असण्याचे कारण नव्हते आणि असल्यासही अशी मारहाण करणे त्याहुन गैर आहे अशा आशयाची प्रतिक्रिया मदन शर्मा यांंनी दिली आहे.
काही वेळापुर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा मदन शर्मा यांंच्या भेटीसाठी गेले होते, यावेळी आठवले यांंनी शर्मा यांंना पाठींंबा देत जे चित्र शेअर केले गेले काहीही गैर नसुन तेच वास्त्व होते. शिवसेनेच्या संजय राउत यांंनी खरोखरच कॉंंग्रेस आणि NCP समोर हात जोडुन त्यांंचा पाठिंंबा मिळवला होता त्यामुळे जे खरं आहे त्यात वाईट वाटुन घ्यायची काहीच गरज नव्हती अशा प्रकारे एका निवृत्त अधिकार्याला मारहाण करणे हे गैरच आहे आणि त्यांंना न्याय मिळावा यासाठी आपण गृहमंत्री अमित शाह यांंची सुद्धा भेट घेणार आहोत असे माध्यमांंना सांंगितले होते.
ANI ट्विट
I request Chief Minister Uddhav Thackeray ji that if you cannot run the government, then you should resign. Let people elect a government that can maintain law and order in Maharashtra: Madan Sharma, retired Navy officer who alleged he was beaten up by Shiv Sena workers in Mumbai https://t.co/sNoSt2x6Zy pic.twitter.com/4E7OabQrrj
— ANI (@ANI) September 13, 2020
दरम्यान, मदन शर्मा यांची मुलगी शिला शर्मा हिने ANI ला सांगितले की, वडिलांनी एक मेसेज फॉरवर्ड केल्याने त्यांना धमक्या देण्यात आल्या. तसेच घरात घुसून सुद्धा त्यांना मारहाण केली. यावर त्यांंच्या मुलीने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सुद्धा केली होती.