Dombivali Crime: डोंबिवलीतील 28 वर्षीय तरुणाने ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजी अॅपमध्ये पैसे गमवल्यानंतर एका महिलेची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. तरुणाने वृध्द महिलेची हत्या केली त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना 13 रोजी घडली. पोलिसांना हत्येची माहिती मिळताच आरोपीचा शोध घेतला अखेर दोन दिवसांत आरोपीला पोलिसांनी शोधून काढले. (हेही वाचा- नालासोपाऱ्यात खाणीतील जलाशयात पाच मुलांचा बुडून मृत्यू, दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरू)
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील कोपर क्रॉस रोड येथील वसंत विहार इमारतीत ही घटना घडली. 14 जून रोजी विष्णू नगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींने हत्या केल्यानंतर सोन्याची चेन आणि कानातले हिसकावले. नंतर बाहेरून दरवाजा बंद करून तेथून फरार झाला. दुपारी 2 ते 6 या वेळे दरम्यान हत्या करण्यात आली होती.
गुरुवारी दरवाजा बाहेरून बंद असल्याचा रहिवाशांना आढळले. रहिवाश्यांनी दरवाजा उघडला आणि महिला मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी विरार येथे राहणाऱ्या तिच्या मुलीला आणि स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णावाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांनी दोन पथके तयार केले. परिसरातील स्थानिकांची चौकशी केली आणि त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले. चौकशी करता इमारतीत राहणारा सतिश विचारे यांची माहिती मिळाली. पोलिसांनी कंबर कसून त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याने खून केल्याचे कबूल केले. तिच्या घरी पाणी पिण्याच्या बहाणे गेला होता. त्यानंतर तीची हत्या केली आणि तो घटनास्थळावरून फरार झाला. त्याने सांगितले की, त्याने नुकतेच 60,000 रुपये ऑनलाइन गेमिंगमध्ये गमावले होते.